नागपूर : गाव... आपल्यापैकी अनेकांना आवडते. तसेही अनेकांचा जन्म गावातच झाला आहे. कामानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त अनेकजण शहरात स्थायी झाले आहेत. मात्र, त्यांची नाळ गावाशी जुळलेलीच. गावात कोंबडा आरवताच सकाळ होते. सकाळ होताच गावात नित्यक्रमाने प्रत्येकजण आपापल्या कामाला लागतो. झाडझूड करणे, सरकी पुसणे, कपडे धुणे, जनावरांना चारा टाकणे आदी काम रोजचेच. मात्र, एक गाव असे आहे जिथे हे सर्व होते मात्र वेगळ्याच (Equal treatment of women) पद्धतीने. कारण, हे सर्व काम करणारे असतात (Men do women's work) पुरुष. या गावाचे नाव आहे विहीरगाव... (Vihirgaon-women-in-Nagpur-district-get-equal-treatment)
नागपूर जिल्ह्यात येणारे विहीरगाव हे १,३०० लोकवस्तीचे गाव आहे. येथे ३०० कुटुंब वास्तव्यास आहे. हे गाव उमरेड मार्गावर येते. या गावात ‘वोट हमारा, राज हमारा’ या अभियानाअंतर्गत एक वेगळाच प्रयोग सुरू झाला. येथील काही स्त्रियांनी एकत्र येऊन महिला राजसत्ता अभियानास सुरुवात केली. या अंतर्गत ८ मार्च म्हणजे जागतिक महिला दिनी महिला कोणतेही काम करीत नाही. या दिवशी महिला पुरुषांप्रमाणे खुर्चीवर बसून आराम करतात तर पुरुष घरातील सर्व काम करीत असतात.
या दिवशी घरासह बाहेरची सर्व कामे पुरुष करीत असतात. यामध्ये केर काढणे, साफसफाई, मुलांची तयारी आणि पहाटेच्या चहापासून ते रात्रीच्या स्वयंपाकापर्यंत जेवढी कामे असतात ती सर्व कामे पुरुष करीत असतात. तेही खेळीमेळीच्या वातावरणात. २०१५ पासून या अभियानाला विहीरगावात सुरुवात झाली. सुरुवातीला महिला दिनीच हा प्रकार घडत होता. कालांतराने पुरुषांच्या मनात परिवर्तन झाले आणि काही पुरुष रोजच हा प्रकार करीत असतात. मस्कीड चांदेकर, नरेश रामटेके, माणिक खंडाईत, राहुल मेश्राम, अमेश भोयर आदी पुरुष हे घरातील काम नेहमी करीत असातात.
अधिकार आणि कर्तव्य यासंदर्भाने जागरूकता वाढविणे व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अधिकाधिक महिलांना कसे आणता येईल याबद्दल या अभियानातून प्रयत्न केले जाते. पोळ्याला एक दिवस का होईना बैलांना आराम दिला जातो, त्यांची काळजी घेतली जाते. मग दिवसरात्र राब राब राबणाऱ्या महिलांनाही एखादा दिवस आराम का नको हा विचार अभियानातील महिला सदस्यांच्या मनात आला. त्यांनी याविषयी चर्चा केली आणि एक दिवस महिलांची कामे पुरुषांनी करायची यावर शिक्कामोर्तब झाले.
गावातील जुन्या जाणत्या, वडीलधाऱ्यांना याबाबतीत माहिती देण्यात आली. घरातील कर्त्या माणसांसोबत चर्चा करून या अभिनव उपक्रमाबद्दल राजी करण्यात आले. काहींनी प्रारंभी या उपक्रमाला हास्यास्पद ठरविले. हळूहळू त्यांनीही या उपक्रमात भाग घेऊन एक दिवस महिलांच्या नावे केला. २०१५ पासून या गावातील पुरुष महिला दिनी घरातील सगळ्या कामांची धुरा आपल्या खांद्यावर घेतात. अशाप्रकारे एक दिवस का होईना महिलांना पुरुषांसारखे खुर्चीवर बसून चहा पिता येतो, प्रेमाने हाक देऊन जेवण नवऱ्याकडून बोलविता येते. वर्षातील ‘एक उनाड दिवस’ कोणतेही घरकामाचे टेन्शन न घेता घालवता येतो.
२००० मध्ये अभियानाला सुरुवात
महिला राजसत्ता आंदोलन संघटनेची स्थापना २००० मध्ये झाली. याची सुरुवात चंद्रपूर जिल्ह्यातील सायघाता गावातून झाली. आज ही संघटना महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांमध्ये काम करीत आहे. ‘वोट हमारा, राज हमारा’ यावर महिलांचे अधिवेशनही भरले होते. आज ही संघटना महिलांच्या हक्कासाठी काम करीत आहे.
घर दोघांचे मग चुलही दोघांची
एक दिवस चुलमुक्त का? तिची हक्काची सुटी म्हणून एक दिवस चुलमुक्त नको का? तिला हक्काच्या सुटीची गरज नसून सहभागाची गरज आहे. घरकामात प्रतिष्ठा प्राप्त व्हावी या उद्देशाने. घर दोघांचे मग चुलही दोघांची ना, असे संयुक्त चूल मालकी अभियानाची सदस्य पुष्पा बनकर म्हणाल्या.
(Vihirgaon-women-in-Nagpur-district-get-equal-treatment)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.