मंत्र्यांनी चक्क प्रशासनालाच ठरवलं खोटं; म्हणतात, 'सोयाबीन नुकसानाच्या प्रस्तावाबाबत अनभिज्ञ'

मंत्र्यांनी चक्क प्रशासनालाच ठरवलं खोटं; म्हणतात, 'सोयाबीन नुकसानाच्या प्रस्तावाबाबत अनभिज्ञ'
Updated on

नागपूर : मागील वर्षीच्या खरीप हंगामात नागपूर जिल्ह्यात (Nagpur District) झालेल्या सोयाबीन नुकसानासाठी (Loss of Soyabean crops) सुमारे ६४ कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाकडे (Maharashtra Government) पाठविला होता. परंतु मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Cabinet Minister Vijay Wadettiwar) या प्रस्तावाबाबत अनभिज्ञ आहेत. प्रस्ताव आला नसल्याचे सांगून एकप्रकारे प्रशासनालाच त्यांनी खोटे ठरविले आहे. (Vijay Wadettiwar did not know about Proposal regarding loss of soyabean crops)

मंत्र्यांनी चक्क प्रशासनालाच ठरवलं खोटं; म्हणतात, 'सोयाबीन नुकसानाच्या प्रस्तावाबाबत अनभिज्ञ'
नागपूरकरांनो, कोरोना लसीचा दुसरा डोस हवाय? जाणून घ्या तुमच्या घराजवळील केंद्रांची यादी

मागील वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच सोयाबीनवर आलेल्या रोगामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. जिल्ह्यात जवळपास संपूर्ण सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाच्या सर्वेक्षणात तशी बाब समोर आली. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाकडून मदत मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु शासनाने पुरामुळे झालेल्या नुकसानासाठीच मदत दिली.

प्रत्यक्षात सोयाबीन पिकाचे नुकसान क्षेत्र हे पुरामुळे झालेल्या नुकसानापेक्षा जास्त होते. जिल्हा प्रशासनाने सोयाबीनच्या नुकसानाच्या मदतीसाठी ६४ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला. परंतु शासनाकडून मदतच मिळाली नाही. आता मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रस्तावच आला नसल्याचे सांगून एकप्रकारे प्रशासनालाच खोटे ठरविले. मात्र याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. प्रशासनाने प्रस्ताव पाठविला असल्याने खुद्द मंत्रीच विभागाच्या कारभाराबाबत अनभिज्ञ असल्याची टीका होत आहे.

सोयाबीन नुकसानाचा प्रस्ताव अद्याप आपल्यापर्यंत आला नाही. आल्यावर त्यावर योग्य निर्णय घेण्यात येईल.
- विजय वडेट्टीवार, मंत्री मदत व पुनर्वसन.
मंत्र्यांनी चक्क प्रशासनालाच ठरवलं खोटं; म्हणतात, 'सोयाबीन नुकसानाच्या प्रस्तावाबाबत अनभिज्ञ'
कुपोषित बालकांच्या जीवाशी खेळ; मिळणाऱ्या धान्याला चक्क लागली बुरशी
सोयाबीन शेतीचे नुकसान झाले आहे. त्यांच्याकडे पैसा नाही. बियाण्यांचे दर वाढणार आहेत. त्यामुळे सरकारने बियाणे शेतकऱ्यांना मोफत दिले पाहिजे.
- राजानंद कावळे, शेतकरीनेते.
सरकारमधील मंत्र्यांनाच प्रस्तावाबाबत माहिती नाही. ही शोकांतिका आहे. सरकारला शेतकऱ्यांची खरच चिंता असेल; तर त्यांना तत्काळ नुकसानासाठी मदत दिली पाहिजे.
- कैलास बरबटे, सदस्य जि. प., नागपूर.

(Vijay Wadettiwar did not know about Proposal regarding loss of soyabean crops)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.