दुर्दैवं! वृद्ध महिलेच्या मृतदेहावर अंत्यक्रिया करण्यासही नातेवाईक आणि गावकऱ्यांचा नकार; अखेर...

death
death
Updated on

कोदामेंढी ( जि. नागपूर) : माणसाच्या आयुष्यातील शेवटची घटका म्हणजे अंत्यविधी. मरणानंतर प्रत्येकाचे विधिवत सोपस्कार पार पाडले जातात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटीने हाहाकार माजविला आहे. आजच्या घडीला प्रत्येक व्यक्ती भीती आणि दहशतीत जगत आहे. माणूस माणसाला कुत्र्यासारखा दूर लोटतो आहे. प्रत्येकाला स्वतःचा जीव प्रिय वाटू लागला असून मरणातदेखील कुणी जाण्यास तयार नाही. मानवी मनाला लाजवेल पण मनाला न पटणारा असाच एक प्रकार मौदा तालुक्यातील शिवाजीनगर (तुमान) येथे घडला.

death
बळीराजावर यंदाही बोगस बियाण्यांचे संकट; कर्जमाफी, पीकविमा कागदावरच

७५ वर्षीय म्हातारी शनिवारी (ता.१७) जावयाच्या घरी मरण पावली. मात्र तिचा अंत्यविधी पार पाडण्यासाठी, तिला स्मशानघावर नेण्याकरिता कुणी नातेवाईक आणि गावातील समाज घटकाने पुढाकार घेतला नाही. कारण होते जावई कोरोना पॉझिटिव्ह असल्याने गावातदेखील सात आठ लोकं पॉझिटिव्ह निघाल्याने लोक भीतीपोटी हादरून गेले आहेत.

३० ते ४० लोकवस्तीचे शिवाजी नगर (टोली) गाव. मौदा तालुक्यातील तुमान गटग्रामपंचायतमध्ये त्या गावाचा समावेश आहे. गावात ७ ते ८ लोक कोरोना पॉझिटिव्ह निघाले आणि त्यात मृताचे जावईदेखील कोरोना पॉझिटिव्ह. शनिवारी दुपारी चारच्या दरम्यान नागपुष्पमाली व्यंकटेश्वराव कंठमनेनी (वय७५) या महिलेचा ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने मृत्यू झाला. ऑक्सिजन लेव्हल कमी होऊन मृत्यू होणे आणि जावई पॉझिटिव्ह असल्याने तीदेखील कोरोनाने मृत झाली, असावी असा नातेवाइक आणि गावकऱ्यांचा समज झाला. त्यामुळे तिच्या मृतदेहाजवळ कुणी नातेवाईक, आप्तस्वकीय व गावकरी जाण्यास तयार नव्हते.

ही वार्ता गावभर पसरली. तहसीलदार प्रशांत सांगडे यांना घटनेची माहिती मिळाली. त्यांनी लगेच प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली. तलाठी प्रणय डंभारे आणि ग्रामसेवक विनोद वरुडकर गावात पोहचले. रात्रीचे दहा वाजले. अख्खा गाव शांत. माणूस माणसाला दिसेना. काडीचा आवाज देखील येईना. मृतावर अंत्यविधी पार पाडण्याची सर्वस्वी जबाबदारी ग्रामसेवक आणि तलाठी यांच्यावर. रात्री अंत्यविधी न करता उद्या सकाळी करावी, असा हट्ट दुसऱ्या जावयाने धरला. त्यामुळे ते निघून गेले. मृतदेह तसाच घरी पडून होता.

दुसऱ्या दिवशी आज सकाळी (रविवारला) ग्रामसेवक विनोद वरुडकर, तलाठी प्रणय डंभारे, कोतवाल भारत ठवरे आणि ग्रा.पं.चा शिपाई यांनी अंत्यविधीची तयारी केली. तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी कामठीहुन अँब्युलन्ससह दोन व्यक्ती मृतदेह हाताळण्यासाठी बोलाविले. मृताच्या अंगावरील दागिने जावयाच्या स्वाधीन करीत मृतदेह अँब्युलन्समध्ये टाकला आणि सरळ स्मशानघाटावर नेले. अंत्यविधीला एक जावई व्यतिरिक्त गावातील कुणी गावकरी, नातेवाईक अथवा आप्तस्वकीय यापैकी कुणीही नव्हते. त्यामुळे मृतदेहास अग्नी देण्याकरिता सरण कुणाला रचता येईना.

death
आरोग्यदायी मॅसेजेसच्या भडीमाराने मानसिकता जाम; मानसतज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

अखेर ग्रामसेवक विनोद वरुडकर यांनी सरण रचले. अग्नी देऊन अंत्यविधीचे सोपस्कार पार पडले. मानवी मनाला लाजवेल असा प्रकार घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. तहसीलदार प्रशांत सांगडे यांचे नियोजन त्याचबरोबर ग्रामसेवक विनोद वरुडकर, तलाठी प्रणय डंभारे, कोतवाल भारत ठवरे आणि शिपाई यांच्या कार्याला सलामी देत त्यांच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे.

ती महिला कोरोना पॉझिटिव्ह नव्हती. त्यांचा ऑक्सिजन लेव्हल कमी झालेला होता. त्यांना वेळीच उपचार हवा होता. लोक कोरोनाच्या दहशतीत जगत आहेत. प्रशासनाला कळवायला पाहिजे. मी आपली माणसे पाठवून अंत्यविधी पार पाडला.

प्रशांत सांगडे, तहसीलदार, मौदा

संपादन - अथर्व महांकाळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()