नागपूर : गौराई म्हणजेच महालक्ष्मींचा एक फोटो राज्यभर व्हायरल झाला, है महालक्ष्मीचे मुखवटे इतके सुंदर, मानवीय व बोलके होते, की ते खरे आहेत, की खरोखर एखादी खो देवीच्या पेहरावात उभी आहे, हा भेद ओळखता येत नव्हता. अनेकांना सुरुवातीला हे मुखवटे आहेत हे खरेच वाटले नाही. अन् हे सुंदर मुखवटे तयार करणारे मूर्तिकार होते अमरावतीचे अतुल आणि अनिल जिराफे आणि त्यांच्यापासून सुरू झालेला गौराईच्या मुखवट्यांचा अमरावती पॅटर्न आज राज्यभर प्रसिद्ध झाला.
या मुखवट्यांच्या निर्मितीबद्दल अतुल जिराफे सांगतात, आम्ही पूर्वी केवळ गणेशोत्सवात देखाव्यासाठी मूर्ती तयार करायचो. घरोघरी विराजमान होणाऱ्या महालक्ष्मीचे मुखवटे हे पारंपरिकच असायचे, पण मुंबई स्थित श्रीकांत भारतीय यांनी आम्हाला महालक्ष्मी आणि झोला-झोलीचे असे मुखवटे स्थापनेसाठी बनवून मागितले.