Nagpur Hit And Run Video: "त्या मुलाला वाचवण्यासाठी..." नागपूर ऑडी अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

Nagpur Audi Hit And Run Case: महाराष्ट्रातील एका मोठ्या राजकीय नेत्याच्या मुलाच्या नावावर असलेल्या ऑडी कारने सोमवारी रात्री उशिरा नागपूरच्या रामदासपेठ परिसरात अनेक वाहनांना धडक दिली होती.
Viral Video Of Audi Hit And Run In Nagpur
Viral Video Of Audi Hit And Run In NagpurEsakal
Updated on

Viral Video Of Audi Hit And Run In Nagpur:

महाराष्ट्रातील एका मोठ्या राजकीय नेत्याच्या मुलाच्या नावावर असलेल्या ऑडी कारने सोमवारी रात्री उशिरा नागपूरच्या रामदासपेठ परिसरात अनेक वाहनांना धडक दिली होती. या घटनेनंतर चालक आणि अन्य एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ऑडी कारने प्रथम जितेंद्र सोनकांबळे यांच्या कारला धडक दिली. यानंतर ती मोपेडला धडकली. या धडकेने त्यावरून प्रवास करणारे दोघे जखमी झाले. एवढेच नाही तर ऑडी कारने मानकापूर परिसरात जाणाऱ्या अन्य काही वाहनांनाही धडक दिली.

दरम्यान महाराष्ट्र काँग्रेसने एक्सवर या अपघाताचा व्हिडिओ शेअर करत महाराष्ट्राच्या गृह खात्याला अनेक प्रश्न विचारले आहेत.

"नागपूरमध्ये भाजपच्या एका बड्या नेत्याच्या सुपुत्राने मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेत चार ते पाच गाड्यांना धडक दिली, त्यानंतर संपूर्ण गृहखातं त्या मुलाला वाचवण्यासाठी व लपवाछपवी करण्यासाठी कामाला लागलं. मग कायदा आणि सुव्यवस्था फक्त सामान्य जनतेला छळण्यासाठीच आहे का?" अशी पोस्ट महाराष्ट्र काँग्रेसच्या एक्स अकाउंटवरुन करण्यात आली आहे.

Viral Video Of Audi Hit And Run In Nagpur
Dhananjay Munde: "सहा हजार मतांनी इज्जत गेली, खोलवर जखम झाली" लोकसभा निकालाबाबत मंत्री धनंजय मुंडेंची खंत

याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, 'कारचा चालक अर्जुन हावरे आणि रोनित चित्तमवार यांना पोलो कारमधून प्रवास करणाऱ्या लोकांनी थांबवले. त्यांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले, तेथून पुढील तपासासाठी त्यांना सीताबर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

या अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, "ऑडी कारमधून प्रवास करणारे लोक धरमपेठेतील एका बिअर बारमधून परतत असताना ही घटना घडली. मात्र, यापैकी कोणी मद्यधुंद अवस्थेत होते की नाही, याची माहिती त्यांनी दिली नाही. सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सोनकांबळे यांच्या तक्रारीवरून बेदरकारपणे वाहन चालवणे आणि इतर आरोपांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हावरे आणि चित्तमवार यांची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली.

Viral Video Of Audi Hit And Run In Nagpur
Nagpur Crime: "मामा मागच्या दाराने आले अन्..." सासू ठेवत होती पाळत म्हणून सुनेने दिली खुनाची सुपारी, चिमुकलीनं सांगितलं आजीसोबत काय घडलं?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.