Buldhana : पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या आदिवासी गावातील पाण्याची टाकी पहिल्याच पावसात जमीनदोस्त

यासाठी कंत्राटदार सोबतच अधिकारी ही जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.
Rain Sangrampur Buldhana
Rain Sangrampur Buldhanaesakal
Updated on
Summary

पावसाळा लागण्यापूर्वी बांधकाम पूर्ण झाले. यातून पाणी पुरवठा सुरू होण्याअगोदरच टाकीचे बांधकाम पडले आहे.

संग्रामपूर (बुलढाणा) : पहिल्याच पावसात आदिवासी गावातील (Tribal Village) पाण्याची टाकी जमीनदोस्त झाल्याची घटना आज पहाटे समोर आलीये. सदर टाकीचे बांधकाम जलजीवन मिशन योजनेअंतर्गत (Jal Jeevan Mission Yojana) करण्यात आले असून अवघ्या 5 महिन्याच्या कालावधीतच बाधकाम कोसळल्याने बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.

यासाठी कंत्राटदार सोबतच अधिकारी ही जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. प्राप्त माहितीनुसार, चिचारीत 'हर घर जल' या नाऱ्यानुसार जलजीवन मिशन योजनेअंतर्गत आलेवाडी आणि चिचारी या दोन आदिवासी गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी 5 महिन्यांपूर्वी पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू झाले.

Rain Sangrampur Buldhana
Maratha Reservation : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून मराठ्यांचं आंदोलन; जरांगेंचा फोन आला अन् त्यांनी..

पावसाळा लागण्यापूर्वी बांधकाम पूर्ण झाले. यातून पाणी पुरवठा सुरू होण्याअगोदरच टाकीचे बांधकाम पडले आहे. ज्या ठिकाणी टाकीचे बांधकाम केले गेले, ती जागा पहाडी असल्याने खाली पायाचा भाग हा टणक आहे. कॉलम करण्यासाठी यंत्राचा उपयोग करावा लागतो, असे असतानाही पावसाच्या पहिल्याच पाण्यात कॉलम तुटून पडल्याने टाकीचे बांधकाम कोसळले. यावरून बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्न चिन्ह निर्माण होताहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.