सावधान... तो पुन्हा येतोय?

कोरोना नियंत्रणासाठी मास्क घाला, अंतर ठेवा, स्वच्छता राखा
Corona
CoronaSakal
Updated on

नागपूर - ज्या महामारीने गेली दोन वर्षे जिल्ह्यात लाखो व्यक्तींना संक्रमणाच्या विळख्यात घेतले. हजारोंचा बळी घेतला. जनजीवन विस्कळित केले, तो कोरोना संपला म्हणून साऱ्यांनी तोंडावरचा मास्क काढला. कोरोनावर मात करण्यासाठी लाख लोकं लसवंत झाले. आता कोरोना येणार नाही, या भ्रमात असतानाच कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. राज्यात अनेक जिल्हयामध्ये वाढ होत असतानाच नागपूर जिल्ह्यमध्येही वाढ होताना दिसत आहे. यामुळे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. अंतर राखण्यापासून तर तोंडावर मास्क घालून, स्वच्छतेवर भर देत कोरोनाला दूर ठेवण्याशिवाय पर्याय नाही.

आता कुठे कोरोनाच्या विळख्यातून सुटल्यानंतर जनजीवन पूर्वव्रत होत आहे. कोरोनाचे निर्बंध पुर्णपणे उठवले आहेत. परंतु रुग्णसंख्येचा आलेख वाढत असल्याने पुन्हा कोरोना नियंत्रणासाठी नकोसे असलेले निर्बंध लागण्याचे संकेत मिळत आहेत. नागपूर जिल्ह्यात एप्रिल महिन्यात अवघे १० सक्रिय कोरोनाबाधित शिल्लक राहिले होते. परंतु निष्काळजीपणामुळे जिल्ह्यात सक्रिय बाधितांची संख्या १० वरून ३८ वर पोहोचली आहे. यामुळ कोरोनाची पुन्हा दहशत वाढली आहे. जून महिन्याच्या पहिल्या दोन दिवसात १८ जणांना कोरोनाची लागण झाली. १ आणि २ जून रोजी नागपुरात प्रत्येकी ९ असे १८ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. २ जून, गुरुवारी शहरात ३४१ तर ग्रामीण भागात ७७ अशा एकूण ४१८ चाचण्या झाल्या. यात ९ जण कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. गुरूवारी शहरात ७ आणि ग्रामीण भागात २ असे ९ बाधित आढळले.

ग्रामीणमध्ये होतेय वाढ

कोरोनाच्या पहिल्या तिन्ही लाटेंमध्ये शहरात कोरोनाचे रुग्ण जास्त आढळत होते. यानंतर ग्रामीण भागातील बाधितांचा आकडा फुगत होता. मात्र अलिकडे मागील तीन चार दिवसांपासून ग्रामीण भागात कोरोना चाचण्यांची संख्या कमी आहे, परंतु कोरोनाचे रुग्ण जास्त आढळून येतताहेत. याउलट कोरोनाच्या चाचण्याची संख्या शहरात जास्त होत असतानाही बाधितांची संख्या मात्र कमी आहे. ग्रामीण भागात सध्या २३ बाधित आहेत. तर शहरात १५ कोरोनाबाधित आहेत.

झोननिहाय निःशुल्क चाचणी केंद्र

लक्ष्मीनगर : आरपीटीएस पोलिस प्रशिक्षण केंद्र, जेरिल लॉनजवळ लक्ष्मीनगर.

जयताळा यूपीएचसी, हनुमान मंदिर मनपा शाळेजवळ.

कामगारनगर यूपीएचसी, सुभाषनगर बुद्ध विहारजवळ.

धरमपेठ : तेलंखेडी यूपीएचसी, रामनगर आयुर्वेदिक हॉस्पिटल, मनपा हिंदी प्राथमिक शाळेजवळ

हजारी पहाड यूपीएचसी, वार्ड क्र. ६७ वाचनालय

सदर रोगनिदान केंद्र, कॅनरा बँकेच्या समोर

फुटाळा यूपीएचसी, अमरावती रोड गल्ली नं. ३ मनपा शाळेसमोर

हनुमाननगर : हुडकेश्वर यूपीएचसी, शिवाजी कॉलनी, नासरे सभागृहजवळ

मानेवाडा यूपीएचसी, व्हॉलिबॉल मैदान, ओंकारनगर

धंतोली : कॉटन मार्केट यूपीएचसी, संत्रा मार्केटजवळ

बाबुलखेडा यूपीएचसी, मानवता हायस्कूल

नेहरूनगर : नंदनवन यूपीएचसी, दर्शन कॉलनी गजानन महाराज मंदिरजवळ

बिडीपेठ यूपीएचसी, शिव मंदिरजवळ, त्रिकोणी मैदान

ताजबाग हेल्थ पोस्ट, रुबी ट्रेनिंग सेंटर ताजबाग

दिघोरी हेल्थ पोस्ट, समाज भवन दिघोरी दहन घाटजवळ

गांधीबाग : मोमीनपुरा यूपीएचसी, कचरा टबजवळ, मोमीनपुरा डी.एड. कॉलेजलगत

स्व. प्रकारराव दटके महाल रोगनिदान केंद्र, कोतवाली पोलिस चौकीजवळ

भालदारपुरा यूपीएचसी, मनपा अग्निशमन केंद्र मनपा उर्दू शाळेजवळ गंजीपेठ

नेताजी दवाखाना, गोळीबार चौक पाटवी गल्ली

सतरंजीपुरा : शांतीनगर यूपीएचसी, मुदलीयार चौक

मेहंदीबाग यूपीएचसी, लिगल सेलिब्रेशन रोड, देवतारे चौक राष्ट्रसंत तुकडोजी हॉल मेहंदीबाग रोड

कुंदनलाल गुप्तानगर हेल्थ पोस्ट, पंचवटीनगर मैदान

जागनाथ बुधवारी यूपीएचसी, टी.बी. हॉस्पिटलजवळ गोळीबार चौक रोड

लकडगंज : पारडी यूपीएचसी, सुभाष मंदिर पारडी, महाराणी लक्ष्मीबाई शाळेमागे

डिप्टी सिग्नल, संजयनगर शाळेजवळ शितला माता मंदिर चौक

हिवरीनगर यूपीएचसी, पॉवर हाउसजवळ जयभिम चौक

भरतवाडा यूपीएचसी, विजयनगर भरतवाडा

आशीनगर : शेंडेनगर यूपीएचसी, शांती विद्या मंदिरजवळ

पाचपावली यूपीएचसी, लष्करीबाग मराठी प्राथ. शाळा आवळेबाबू चौक

बंदेनवाज यूपीएचसी, आझादनगर हेल्थ पोस्ट फारूक नगर टेका

पाचपावली, पोलिस क्वॉर्टरजवळ

मंगळवारी : इंदोरा, बेझनबागनगर जवळ

झिंगाबाई टाकळी यूपीएचसी, मनपा शाळेजवळ

जरीपटका दवाखाना

नारा यूपीएचसी, हनुमान मंदिरजवळ नारा

राजनगर, नॅशनल फायर इंजिनिअरिंग कॉलेजजवळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.