Wedding Season : लग्नानंतर विविध कागदपत्रे तयार करताना नियमांनुसार येणाऱ्या अडचणी लक्षात घेता व कायद्याच्या कचाट्यात अडकू नये म्हणून विवाह नोंदणी पद्धतीला जोडप्यांचे प्राधान्य असते. परंतु, ही पद्धत पूर्ण कशी करावी, याबाबत अनेकांमध्ये सभ्रम आहेत.
विशेष विवाह कायदा १९५४ नुसार विवाहेच्छुक वधू-वरांना नियोजित विवाहाची नोटीस, वय, रहिवासाच्या पुराव्याच्या कागदपत्रांसह जिल्ह्याच्या विवाह अधिकाऱ्यांकडे शुल्कासह सादर करावे लागतात. वधू-वर अटींसह कागदपत्रांची पूर्तता करीत असल्यास ही नोटीस स्वीकारून विवाह अधिकारी ती नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करतात.
दोघांपैकी एकजण इतर जिल्ह्यातील असल्यास या नोटीसची प्रत त्या जिल्ह्याच्या विवाह अधिकाऱ्यांकडे पाठविले जाते. ही नोटीस बोर्डवर प्रसिद्ध झाल्यानंतर ३० दिवसांच्या कालावधीत आक्षेप न आल्यास कायदेशीर पद्धतीने विवाह करता येतो. जिल्हा मुख्यालयातील दुय्यम निबंधक हे विवाह अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
सरकारने विशेष विवाह नोंदणी प्रक्रियेचेही संगणकीकरण केले आहे. यासाठी राज्यातील विवाह अधिकाऱ्यांची कार्यालये मध्यवर्ती सर्व्हरवर जोडली आहेत. अर्ज भरण्यासाठी https://igrmaharashtra.gov.in/Home यावर भेट द्यावी लागेल.
ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर जोडप्यांना संगणकीय प्रणालीद्वारे नोटीस क्रमांक व नोटीस दिल्यापासून ३० दिवसांनंतर आणि ६० दिवसांच्या अगोदर विवाहासाठी येण्याची तारीख एसएमएसद्वारे कळवण्यात येईल. ऑनलाइन नोटीस अर्ज भरण्यापूर्वी संगणकाला वेब कॅमेरा व थम्ब स्कॅनर असणेही गरजेचे आहे. ऑनलाइन विवाह नोंदणीचे शुल्क ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
अर्ज भरताना वधू-वर यांचे आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, वधू-वर यांच्या वयाचा, ओळखीचा व रहिवासी पत्ता असणारा पुरावा, तीन साक्षीदारांच्या ओळखीचा व रहिवासी पत्ता असणारा पुरावा आवश्यक आहे.
२०१९ - २ हजार ३८९
२०२० - २ हजार ५२०
२०२१ - ३ हजार ३४४
२०२२ - ३ हजार ४६५
२०२३ - ३ हजार ८०९
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.