वाडीतील ‘वेलट्रिट’ अग्निकांड : प्रशासनाच्या डोळ्यात धूळ झोकून सुरू होते रुग्णालय; रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर

Weltweit fire in Wadi The hospital starts with dust in the eyes of the administration
Weltweit fire in Wadi The hospital starts with dust in the eyes of the administration
Updated on

वाडी (जि. नागपूर) : येथील वेलट्रिट रुग्णालयात शुक्रवारी रात्री अतिदक्षता विभागात अचानक आग लागल्याने उपचार घेत असणाऱ्या गंभीर पाच रुग्णांपैकी चार रुग्णांचा नागपूरच्या शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे. प्रशासनाच्या डोळ्यात धुळ टाकीत नियमबाह्य पद्धतीने हे रुग्णालय सुरू होते, असा आरोप होत आहे. घटनेची चौकशी करण्याचे निदेंश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. पोलिसांनी रुग्णालयाला सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंधित करून सील केले.

शनिवारी सकाळी वाडीचे पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी व पथकाने आग लागलेले कक्ष व इतर स्थळांचे निरीक्षण केले. रुग्णालयात उपलब्ध रुग्णांशी संबंधित सर्व फाइल्स व रेकॉर्ड जप्त करण्यात आले. आगीच्या घटनेवेळी एकूण ३१ रुग्ण होते. त्यांना बाहेर काढून नागपूरला पाठवले, असे पोलिस निरीक्षक सूर्यवंशी यांनी सांगितले.

या रुग्णांत आयसीयूमध्ये उपचारासाठी दाखल तुळशीराम पारधी (वय ४७, रा. दर्शन सोसायटी, गोरेवाडा, नागपूर), शिवशक्ती भगवान सोनभसरे (वय ३५, रा. गोंडेगाव, ता. पारशिवनी) प्रकाश बाबूराव बोडे (वय ६९, रा. काचोरे ले-आउट, मनीषनगर), रंजना मधुकर कडू (वय ४४, रा. धापेवाडा) यांचा मृत्यू झाला. इतर २७ रुग्ण नागपुरातील विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

घटनेदरम्यान उपचारार्थ रुग्णांना सुरक्षित बाहेर काढते वेळी मोठ्या प्रमाणात आगीच्या धुराने त्यांचीही प्रकृती बिघडली होती. आता या सर्वांची स्थिती व्यवस्थित असल्याची माहिती रुग्णालय व्यवस्थापनाकडून देण्यात आली. घटनेला वेलट्रिट रुग्णालय प्रशासन जबाबदार सांगून शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेकडून रुग्णालय व्यवस्थापनाने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख व जखमींना ५ लाख नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.

खासगी रुग्णालयांची तपासणी करा

रुग्णालय मागील काही काळापासून वादाच्या भोवऱ्यात असून व रुग्णालय व्यवसायासंबंधी सुविधा व वैध प्रमाणपत्र नसतानाही नियमबाह्य पद्धतीने प्रशासनाच्या डोळ्यात धूळ झोकून रुग्णालय सुरू असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या अशा खासगी रुग्णालयांची तपासणी करावी असे सांगत वेलट्रिट रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने पीडितांना नुकसान भरपाई दिली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.