डॉ.अंशूजा किंमतकर यांनी असे काय केले की ठरला विक्रम...

रामटेकः पुरस्काराने सम्मानित झाल्यानंतर प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.अंशुजा किंमतकर गौरवपत्र दाखविताना.
रामटेकः पुरस्काराने सम्मानित झाल्यानंतर प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.अंशुजा किंमतकर गौरवपत्र दाखविताना.
Updated on

रामटेक (जि.नागपूर) : रामटेक येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.अंशुजा किंमतकर. व्यवसाय जरी डॉक्टरीचा असला तरी त्यांच्यातील एक सच्चा कलावंत त्यांना स्वस्थ बसू देत नाही. आवडत्या छंदासाठी त्यांनी व्यस्त वैद्यकीय व्यवसायातून वेळ काढला आणि त्या कलेचा विक्रम झाला. त्यांच्या कलेने त्यांचे नाव आता अख्ख्या देशात पोहचविले आहे. त्यांच्या कलेचे सर्वत्र कौतुक  होत  आहे.

शुभेच्छापत्रांची निर्मिती
रामटेकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी कामगिरी करणाऱ्या आणि विश्वविक्रमाच्या नकाशावर रामटेकचे नाव कोरणाऱ्या डॉ.अंशुजा किंमतकर यांच्या विश्वविक्रमाची दखल ‘इंडिया बुक ऑॅफ रेकॉर्डस’द्वारे दखल घेण्यात आली आहे. नुकतेच त्याचे प्रमाणपत्र, पदक डॉ.अंशुजा किंमतकर यांना प्राप्त झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आभासी पुरस्कार प्रदान समारंभात हा पुरस्कार वितरित करण्यात आला.प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.अंशुजा किंमतकर या त्यांच्या शुभेच्छापत्रे निर्मिती करण्याच्या आवडत्या छंदासाठी व्यस्त वैद्यकीय व्यवसायातून वेळ काढतात. महाविद्यालयीन जीवनापासून त्यांनी आपला हा छंद जोपासला आहे. त्यांच्या संग्रही आजमितिस ३००० पेक्षा जास्त हस्तनिर्मित शुभेच्छापत्रे आहेत. विशेष म्हणजे ही शुभेच्छापत्रां चॉकलेट रॅपर, पक्ष्यांची पिसे, लग्नपत्रिका, वाढदिवस निमंत्रण पत्रिका, कापडाचे तुकडे, आगपेटीतील काड्या आणि अनेक टाकावू वस्तूंपासून निर्मिती करण्यात त्या पारंगत आहेत. शुभेच्छापत्रांतून सामाजिक संदेशदेखिल देण्याचे काम त्या करतात.

अधिक वाचाः आणि पहाता पाहता आशेवर फिरले पाणी, दुष्काळात आला `तेरावा महिना’

सलग २४ तासात ५०२ शुभेच्छापत्रे
 याव्यतिरिक्त डॉ.अंशुजा या उत्तम कवयित्री, लेखिका आहेत. सामाजिक संदेश देणारी अनेक पथनाट्ये लिहून त्यांचे प्रभावी सादरीकरण देखील त्या करतात. त्यांची पथनाट्ये जि.प.नागपूर ,दैनिक ‘सकाळ’च्या वर्धापन दिनानिमित्त वसंतराव देशपांडे सभागृह येथेसुद्धा सादर करण्यात आली आहेत. १९ व २० एप्रिल २०१९ रोजी वर्ल्ड रेकॉर्डस इंडियाच्या बॅनरखाली सलग २४ तासात ५०२ शुभेच्छापत्रे तयार करून विश्वविक्रम केला. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या वर्णेकर सभागृहात रामटेक येथे त्यांनी हा विश्वविक्रम केला. त्या विश्वविक्रमाची दखल आता "इंडिया बुक ऑॅफ रेकॉर्डस" द्वारे घेण्यात आली आहे. त्याचे प्रशस्तीपत्र, पदक आणि इतर भेटवस्तू त्यांना नुकत्याच आभासी सोहळ्यात प्रदान करण्यात आल्या.

अधिक वाचाः असं काय झालं! अचानक कामठीच्या नागरिकांची वाढली डोकेदुखी, मळमळ

रामटेकचा गौरव
याकामी त्यांचे पती श्री समर्थ शिक्षण मंडळाचे सहसचिव ऋषिकेश किंमतकर, सासू स्वतंत्र महिला सह.पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्ष कुसुमताई किंमतकर, मुले प्रथमेश व अभंग किंमतकर, आई हेमाताई डाबरे यांचा सक्रिय पाठिंबा व सहकार्य लाभले आहे. त्यांच्या या उत्तुंग कामगिरीबद्दल आमदार आशीष जयस्वाल, नगराध्यक्ष दिलीप देशमुख, जिल्हा कॉंग्रेसचे महासचिव उदयसिंग (गज्जू) यादव, प्रहारचे जिल्हा संपर्कप्रमुख रमेश कारामोरे, ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष शैलेंद्र किंमतकर, श्री समर्थ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रसाद किंमतकर, सचिव भारतभाऊ किंमतकर, माजी सरपंच तथा तनिष्का व्यासपिठ-शितलवाडीच्या समन्वयक योगिता गायकवाड, महाराष्र्ट राज्य पत्रकार संघाचे जिल्हा तथा तालुका पदाधिकारी ,न.प.विरोधीपक्षनेता सुमित कोठारी आणि इतरांनी डॉ.अंशुजा किंमतकर यांचे अभिनंदन केले आहे.

संपादन  : विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.