नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यामध्ये ते सुमारे ७५ हजार कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करणार आहेत. यांमध्ये अनेक महत्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. हो प्रकल्प कोणते आहेत? कुठल्या भागात ते होणार आहेत? याची माहिती पंतप्रधान कार्यलयाकडून देण्यात आली आहे. (Which important projects will be inaugurated during PM Modi visit to Maharashtra)
मोदींच्या हस्ते कुठल्या प्रकल्पांचं होणार लोकार्पण
१) नागपूर ते शिर्डी या ५२० किमीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. यासाठी ५५,००० कोटी रुपये इतका खर्च आला आहे.
२) नागपूरच्या ८६५० कोटी रुपयांच्या मेट्रोच्या फेज वनचं लोकार्पण.
३) नागपूरच्या AIIMS रुग्णालयाचं लोकार्पणही मोदींच्या हस्ते होणार आहे. या रुग्णालयाचा खर्च १५७५ कोटी रुपये इतका आहे.
४) नागपूर-बिलासपूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचं लोकार्पणंही होणार.
हे सर्व प्रकल्प विशेषतः नागपूर इथेच होणार आहेत. याशिवाय अनेक नव्या प्रकल्पांची पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.