White Peas Price : भातासोबत ऐटीत मिरवणारा 'पांढरा वाटाणा' १०५ रुपयांवर

Impact Household Budget : एकीकडे डाळी, सर्वच भाज्या महागल्यानंतर सर्वसामान्यांची दैना झाली असताना आता वाटाणाही भडकल्याने सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत.
|White Peas price goes up to Rs 105 per kg household budget impact
White Peas Price Sakal
Updated on

Nagpur News : स्वयंपाकघरात बटाटा, पावभाजी आणि मसाले भातासोबत ऐटीत मिरवणाऱ्या पांढऱ्या वाटाण्याचे दर प्रतिकिलो १०५ रुपयांवर पोहोचले आहेत. उत्पादन कमी झाल्यामुळे भाव वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. एकीकडे डाळी, सर्वच भाज्या महागल्यानंतर सर्वसामान्यांची दैना झाली असताना आता वाटाणाही भडकल्याने सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत.

पावसाळ्यानंतर वाटाण्याचे उत्पादन होते. मात्र पावसाळ्यानंतर प्रतिकूल वातावरणामुळे मागील वर्षी राज्यात वाटाण्याचे उत्पादन कमी झाले होते. वाटाणा पीक हे साधारण एक ते दीड फूट उंचीपर्यंत आणि अतिशय नाजूक असते. थंड वातावरणात या पिकाचे उत्पादन घेतले जाऊ शकते. मध्यप्रदेशातील रतलाम आणि कर्नाटकमधून वाटाण्याची आवक होत आहे.

उत्पादन, आवक कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे किंमत १०५ रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे, असे यांनी सांगितले. पंधरा दिवसापूर्वी वटाणे ९५ रुपये किलो होते. नवीन उत्पादन येईपर्यंत म्हणजेच साधारण नोव्हेंबर महिन्यानंतर किमती कमी होतील असे व्यापाऱ्यांनी सांगितले. हिरवा वटाणा वाळल्यानंतरच त्याचे आवरण काढल्यानंतर तो पांढरा होतो.

|White Peas price goes up to Rs 105 per kg household budget impact
Green Peas Health Benefits : मधुमेह आणि त्वचेसाठी लाभदायी आहे मटार; जाणून घ्या ‘हे’ आरोग्यदायी फायदे

...तर खाद्यपदार्थ महागतील

वाटाण्याचा वापर मुख्यत: मटार पुलाव, पावभाजी, आलू मटार, मटार पराठा या खाद्यपदार्थांमध्ये आणि पदार्थांवरील ‘टॉपिंग’साठी केला जातो. मात्र दर वाढल्याने याचा परिणाम हॉटेल व्यवसायावरही दिसण्याची शक्यता आहे. मटारचे हेच रूप दोन ते तीन महिन्यांपर्यंत राहिले तर पावभाजी, मटार पुलाव या खाद्यपदार्थांच्या किमती वाढतील असे हॉटेलच्या संचालकांचे म्हणण आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com