Ramtek Lok Sabha:
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडले आहे. राज्यात ४८ जागांसाठी मतदान पार पडले. दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघात कोण जिंकणार यावरुन चांगलाच वाद झाला आहे. या वादाचे रुपांतर हणामारीत होवून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
रामटेक लोकसभेच्या निवडणुकीत कोण जिंकणार यावरून झालेल्या हाणामारीत तरुणाचा मृत्यू झाला आहे. नरखेड तालुक्यातील सिंगारखेडा गावात ही घटना घडली. गावातील पारावर बसलेल्या तरुणांना मध्ये रामटेक लोकसभा निवडणूक कोण जिंकणार यावर जोरदार चर्चा सुरू होती. या चर्चेचे रुपांतर नंतर वादात झाले. चर्चेत वादाची ठिणगी पडली आणि वाद वाढून हाणामारी मध्ये बदलला. यात नाजूक जागी मार लागल्याने सतीश फुले तरुणाचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान आरोपी प्रवीण बोरडे याला मारहाण प्रकरणी पोलिसांनी सावरगावमधून ताब्यात घेतले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने रामटेक लोकसभा मतदारसंघ हा प्रतिष्ठेचा बनवला आहे.
शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) राजू पारवे आणि काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांच्यामध्ये लढत झाली आहे. आधी काँग्रेसकडून रश्मी बर्वे मैदानात होत्या मात्र जात वैधता प्रमाणपत्र ऐन वेळी रद्द झालं. या मतदारसंघात सहा विधानसभा आहेत.
रामटेक लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा कल आणि विविध घटक पाहता महायुती अडचणीत आल्याचा अंदाज बांधला जात आहे. रामटेक, हिंगणा, उमरेड आणि सावनेर विधानसभा मतदारसंघात महायुती मतांच्या बाबतीत मागे पडू शकते. काटोल आणि कामठीमध्येच महायुतीसाठी चांगले वातावरण पाहायला मिळाले. त्यातही कामठी नगर परिसरात परिस्थिती चांगली नव्हती. महायुतीतील आमदार, उमेदवार निवड, वंचित बहुजन आघाडीची बदलती भूमिका आदी मुद्द्यांचा मतदारांवर प्रभाव पडला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.