Power Supply : पावसाळ्यात वारंवार वीज पुरवठा का होतो खंडित?

Power Supply : मुसळधार पाऊस नसताना किंवा वादळ नसतानाही वीज पुरवठा खंडित का होतो? असा प्रश्न सर्वांना पडतो.
Power Supply
Power Supply esakal
Updated on

Power Supply : पाऊस आला आणि ‘बत्तीगुल’ झाली हा प्रकार नेहमीचाच झाला आहे. मात्र, मुसळधार पाऊस नसताना किंवा वादळ नसतानाही वीज पुरवठा खंडित का होतो? असा प्रश्न सर्वांना पडतो.

मुख्य कारणे अशी

  • वीज खांबावरील चॉकलेटी रंगाचे चिनी मातीचे डिस्क इन्सुलेटर (चिमणी) तसेच डीपी स्ट्रक्चरवरील पोस्ट इन्सुलेटर उन्हाळ्यात तापतात. त्यावर पावसाचे थेंब पडल्यावर तडे जातात. हा अपघात टाळण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा (ब्रेकर) कार्यान्वित होते. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होतो.

  • याशिवाय भूमिगत वाहिन्यांवर खोदकामाने त्यांना धक्का बसतो. पावसाचे पाणी वाहिन्यांमध्ये शिरते. संततधार पावसामुळे भूमिगत वाहिन्यांमध्ये आर्द्रता निर्माण होऊन वीजपुरवठा खंडित होतो.

  • त्याचप्रमाणे वादळामुळे झाडे, फांद्या तुटून वीज तारा तुटतात. यामुळे शॉर्टसर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होतो.

Power Supply
Lost Mobile : मोबाईल हरविल्यास चिंता सोडा.! केंद्राची यंत्रणा ठरतेय फायदेशीर; महाराष्ट्र देशात तिसऱ्या स्थानी

येथे तक्रार नोंदवा

खंडित पुरवठ्यासाठी वीज ग्राहकांनी महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राच्या १८००२-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी. यासह मोबाईल अॅप आणि www.mahadiscom.in या वेबसाइटद्वारेही तक्रारी करता येऊ शकते.

तसेच मोबाईल क्रमांकावरून NOPOWER<space> <Consumer Number> हा ‘एसएमएस’ महावितरणच्या ९९३०३९९३०३ या मोबाईल क्रमांकावर पाठविल्यास तक्रार नोंदवली जाते, असे महावितरणने कळविले आहे.

विजेपासून सावधान राहा

पाणी हे विजेचे वाहक आहे. ओल्या हातांनी इलेक्ट्रॉनिक उपकरणे हाताळू नये. घरातील वीज जोडणीसाठी लागणारे साहित्य आयएसआय प्रमाणित असावे. सर्व वीज उपकरणांची अर्थिंग योग्य असल्याची खबरदारी घ्यावी. आकाशातील विजेचा कडकडाट होत असेल तर सर्व विद्युत उपकरणे बंद करून ते मूळ वीज कनेक्शनपासून बाजूला करावी.

Power Supply
Ration Card KYC : बोगस धान्य वितरणाला बसणार आळा; रेशनकार्डधारकांना ई-केवायसी अनिवार्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com