श्‍वास बंद होण्याच्या फतव्याची वाट बघायची का, एका नवोदित कविने केला व्यवस्थेविरुद्ध प्रश्न

नागपूरः कवी वेणुप्रशांत ‘सकाळ’ कार्यालयात कवितावाचन करताना.
नागपूरः कवी वेणुप्रशांत ‘सकाळ’ कार्यालयात कवितावाचन करताना.
Updated on

नागपूरः भारताचा इंडिया होतो, तेव्हा काय काय होते मित्रो! संस्कृतीच्या नावाखाली थोपटते विकृती दंड . ‘ड्राय डे’ साजरा करून रिचविल्या जातात एकावर एक दारूच्या बाटल्या. शिकारीसाठी नित्यनवे  शोधले जाते सावज. गरिबीची लक्तरे झाकून झगमगाटात वाकुल्या दाखवित मिरवित उभी असते, स्मार्ट सिटी...इंडियाच्या असह्य ओझाखाली दबला गेलेला बिचारा भारत शेवटचे आचके देत आक्रंदत असतो. चौकाचौकात ‘अच्छे दिन आनेवाले है’...असे दात विचकावीत इतिहास विकृत करून सांगणारे पांढरपेशे कार्यकर्ते हातात झेंडा घेऊन सैराट झालेले असतात. येथली किडलेली व्यवस्था अधिक धर्मांध होऊन आपापसात युद्ध घडवून आणते...आणखी किती यादी वाचावी? प्रा.डॉ. प्रशांत रामदास राऊत उर्फ  वेणूप्रशांत यांच्या ‘भारताचा इंडिया’ या पहिल्या वहिल्या काव्यसंग्रहातून नेमके आजच्या ज्वलंत समस्येवर बोट  ठेवले आहे. ‘भेटी लागे जीवा’ या सदरांतर्गत ‘सकाळ’ कार्यालयात त्यांनी वाचकांशी मुक्त संवाद साधला.त्यावेळी ते त्यांच्या कवितेमागची भूमीका स्पष्ट करताना बोलत होते.

अधिक वाचाः दुर्दैवी! ४ दिवसांपासून शवागारात पडून होता वडिलांचा मृतदेह; पोटच्या पोराने मोबाईल केला बंद.. अखेर…

भारतातील पायाभूत मुल्यांना मुठमाती
कवी वेणूप्रशांत यांचा हा पहिलाच कवितासंग्रह असला तरी या संग्रहातून एका मोठ्या विषयाला हात घातला आहे. काव्य ही ह्रदयाची भाषा असते, असे म्हटले जाते. आणि म्हणूनच इंडियाच्या नावावर लादलेली ही विचारधारा त्यांच्या संवेलनशील ह्रदयाला स्वस्थ कशी बसू देणार? सर्वसामान्यांसारखी विकासास त्यांची मुळीच ‘ना’ नाही. त्यांचा विरोध आहे, विचारांचा, व्यवस्थेशी. ते म्हणाले की, भारत हा सांस्कृतिक, वैचारिदृष्ट्या प्रगल्भ असलेला देश असला तरी त्याच्या पायाभूत मुल्यांना पायदळी तुडवून एक वेगळीच व्यवस्था जन्माला घालणाऱ्यांच्या नियतीत काहीतरी वेगळेच असल्याचा गर्भित इशारा या कवितासंग्रहातून दिला आहे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचाः बेरोजगार मित्र सतत द्यायचा त्रास, कंटाळून तिने केली आत्महत्या

नाठाळाच्या माथी काठी
जगातील १४ हजार युद्धांपैकी बारा हजार युद्धे केवळ आणि केवळ धर्मांमुळे झालीत, म्हणून धर्म म्हणतो, मी माणसाला निर्माण केले नाही.तर माणसाने मला निर्माण केले. अशा परिस्थितीत आणखी काही वर्ष युद्ध घडवून आणले जातील, म्हणून सावधान होण्याचा गरज असल्याचे कवी वेणुप्रशांत हे या काव्यसंग्रहातून सांगतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यासारख्या महापुरुषांना विभागून स्वार्थ साधला जातो. आधुनिक होण्याच्या पैजेतून ‘फाइव्ह जी’ होण्यापर्यंत दाखविण्यात येणारा विकास मात्र कुठे हरविला जातो, याचा पत्ताच नसतो. आमचेच तेवढे खरे इतरांना बोलण्याची मुभा नाही. आमचीच काय ती राष्टभक्ती, इतरांचे बोलणे देशद्रोह, अभिव्यक्तीची गळचेपी हे सगळं कुठल्या दिशेने चालंलय, याचा लेखाजोखा या कवितासंग्रहातून मांडण्यात आला असल्याचे कवी वेणुप्रसाद यांनी सांगितले. हे सर्व बदलाची ताकद केवळ शब्दातच असल्याचा विश्‍वास वेणुप्रशांत यांनी सरतेशेवटी व्यक्त केला.
आता शब्दच बदलू शकतात इतिहास भारताचा
म्हणून कवितेतून नाठाळाच्या माथी काठी हाणतो !

संपादनः विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.