"भूषण शहिद झाला आता दुसऱ्या मुलालाही सैन्यात पाठवणार"; दुःखात बुडालेल्या देशभक्त मातेचे उद्गार

will send second child to Indian Army said mother of  Martyr Bhushan Satai
will send second child to Indian Army said mother of Martyr Bhushan Satai
Updated on

नागपूर : श्रीनगरमधील गुरेज सेक्टर येथे पाकिस्ताने केलेल्या भ्याड हल्ल्यात नागपूर जिल्ह्यातील काटोलचे सुपूत्र जवान भूषण सतई यांना वीरमरण आले. घरी दिवाळीची तयारी सुरू होती अन् ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला जवानाच्या वीरमरणाची बातमी समजली. त्यामुळे कुटुंबीयांसह संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले  ते केवळ २८ वर्षांचे होते. मात्र आपला पुत्र गमावलेल्या एका मातेने "माझा दुसराही मुलगा सैन्यातच जाणार" असे म्हणत देशभक्ती काय असते याचे उदाहरण दिले आहे.  

भूषण सतई यांनी महाविद्यालयात असतानाच सैन्यात भर्ती होण्यासाठी तयारी केली होती. ते वयाच्या वीसाव्या वर्षी भारतीय सैन्यात सहभागी झाले होते. दिवाळीच्या पूर्वसंध्येला गुरेज सेक्टरमध्ये भूषण कर्तव्य बजावत होते. यावेळी पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यावेळी भारतीय जवानांनी शत्रूला जोरदार प्रत्युत्तर दिले.

 यामध्ये तीन सामान्य नागरिकांसह आठ भारतीय जवानांना वीरमरण आले. यामध्ये भूषण सतई यांचाही समावेश आहे. त्यांचे पार्थिव रविवारी वायूसेनेच्या विमानाने नागपुरात दाखल झाले. त्यानंतर कामठी रेजिमेंट येथे त्यांना मानवंदना देण्यात आली. आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी आणण्यात आले.

माझा दुसरा मुलगा देशाचा सैनिक बनविणार
माझे शहीद मुलगा भूषण देशाकरिता बलिदान झाला. तरी दुसरा मुलगा रोशन देशाचा सैनिक बनवणार असे उदगार धाडसी आणि देश भक्त असलेल्या शोकाकुल मातेने अंतिम संस्कार  मुखाग्नी वेळी व्यक्त केले.
-  माता मीरा

मी पेन्शन घेणार नाही, लढणार
अनेक सैनिक विशिष्ट सेवा (बॉण्ड) संपल्यावर पेन्शन घेणे पसंत करतात  परंतु शहीद नायक भूषण सतई हा  मी पूर्ण नोकरी करणार असे जिगर काटोलचा मित्र जन्मू येथे सैनिक असलेला रिकू चरडे सर्वाना सांगत होता. तो नायक व धाडसी असल्याने पुढेच असायचा, सैनिकी अनेक कठीण प्रशिक्षणात प्राविण्य मिळविले होते.त्याचा आम्हाला अभिमान आहे.
- रिंकू चरडे ,
सैनिक मित्र

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.