Nawab Malik : नवाब मलिकांच्या बैठक व्यवस्थेवरून पेच; अजित पवार गटाच्या भूमिकेकडे लक्ष

राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्या विधानसभेतील बैठक व्यवस्थेवरून चांगलाच वाद निर्माण झाला
winter session 2023 nawab malik controversy over seating bjp and ncp ajit pawar group politics
winter session 2023 nawab malik controversy over seating bjp and ncp ajit pawar group politicsEsakal
Updated on

Nagpur News : माजी मंत्री तसेच राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्या विधानसभेतील बैठक व्यवस्थेवरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. विरोधकांसह सत्ताधारी भाजपनेही त्यांच्या बैठक व्यवस्थेवर आक्षेप घेतला. परंतु, प्रशासनाकडून त्यांची जागा निश्चित करण्यात आल्याने मलिकांना दुसरी जागा देण्यावरून तांत्रिक पेच निर्माण झाल्याचे समजते.

नवाब मलिक सध्या जामिनावर बाहेर असून अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी झाले आहेत. ते काल सत्ताधारी बाकांवर बसले होते. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशद्रोहाचे आरोप असलेले नवाब मलिक महायुतीत नको, अशी भूमिका पत्रातून मांडली.

त्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे आज ते बसतील कुठे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ते आजही सत्ताधारी बाकांवरच बसले. बैठक व्यवस्था असलेल्या ठिकाणी ते गेले. सत्ताधारी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अजित पवार गटाने त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांमध्ये मलिक यांचेही नाव दिले असल्याचे समजते.

त्यामुळेच विधिमंडळ प्रशासनाकडून त्यांची व्यवस्था अजित पवार गटातील राष्ट्रवादीच्या इतर आमदारांप्रमाणे सत्ताधारी बाकावर करण्यात आली. प्रोटोकॉलप्रमाणे त्यांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यावर आता अजित पवार गटाची काय भूमिका राहील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नवाब मलिक विधानसभेत कुठे बसले, हा प्रश्न महत्त्वाचा नाही. फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहिले असेल तर त्याचा फार वेगळा अर्थ काढण्याचे कारण नाही. आमच्या गटाला मलिक यांच्याशी कोणतीही राजकीय चर्चा करायची नाही.

winter session 2023 nawab malik controversy over seating bjp and ncp ajit pawar group politics
Winter Session 2023 : मदतीच्या केवळ घोषणाच; अतिवृष्टी, पावसाचा खंड, विमा अग्रिम व अनुदान रखडलेलेच

विधानसभेत ते आमदार म्हणून आल्यानंतर जुने सहकारी एकमेकांना भेटणे स्वाभाविक आहे. मलिकांची भूमिका काय आहे, यासंदर्भात आम्ही चर्चा केलेली नाही. ते वैद्यकीय जामीनावर असल्यामुळे आम्हाला यावर त्यांच्याशी चर्चा करायची नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवाब मलिकांची काय भूमिका असेल, यावर मी भाष्य करू इच्छित नाही

- प्रफुल्ल पटेल, नेते राष्ट्रवादी (अजित पवार गट)

नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा आरोप आहे. त्यामुळे देशहिताच्या मुद्द्यावर महायुती तडजोड करणार नाही. अजित पवार प्रगल्भ नेते आहेत. ते फडणवीस जनतेच्या भावनांचा आदर करतील.

- चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

winter session 2023 nawab malik controversy over seating bjp and ncp ajit pawar group politics
Winter Session 2023 : बेरोजगारी आणि शासकीय नोकऱ्यांच्या कंत्राटीकरणाविरोधात युकाँची विधानभवनावर धडक; पटोले, राऊत, गिरी अटकेत

आमदार नवाब मलिक यांना कुठे बसू द्यावे, हा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे. त्यावर मी बोलणे योग्य नाही. वैद्यकीय जामीनावर सुटल्यानंतर ते पहिल्यांदाच हिवाळी अधिवेशनात आले. मात्र, कुठल्या गटात आहेत याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर मी भाष्य करेल.

- अजित पवार, उपमुख्यमंत्री

भाजप सत्तेसाठी कुठल्याही थराला जाण्यास तयार आहे हे या पत्रावरून स्पष्ट होते. त्यांना खासगीत पत्र लिहिणे शक्य होते. ते जाहीर करण्याची गरज नव्हती.

- बाळासाहेब थोरात, कॉँग्रेसचे नेते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.