‘मुख्यमंत्री अधिवेशनाला आले नाही, यात काही नवीन घडतय अस नाही’

आमचे सरकार सर्व विषयांवर चर्चा करायला तयार आहे. मात्र, विरोधी पक्षाने शेवटपर्यंत गोंधळ घातला
raosaheb danve
raosaheb danveraosaheb danve
Updated on

नागपूर : हिवाळी अधिवेशनाला (Winter session) बुधवारपासून (ता. २२) सुरुवात झाली. मात्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) अधिवेशनाला आले नाही. यात काही नवीन घडतय अस काही नाही. मुख्यमंत्री झाल्यापासून ते मंत्रालयात किती वेळा आले? राज्यात किती दौरे केले? राज्यावरील संकटात ते कधी बाहेर पडले, असे प्रश्‍न केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी उपस्थित केले.

संघ मुख्यालयाला भेट देण्यासाठी ते बुधवारी नागपुरात आले होते. यानंतर कोराडी मंदिरात दर्शनासाठी गेले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आजारी आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. आम्ही देवाला प्रार्थना करतो की, मुख्यमंत्री लवकरात लवकर बरे व्हावे, आणि जनतेच्या सेवेत रुजू व्हावे, असेही दानवे (Raosaheb Danve) म्हणाले.

raosaheb danve
शाळेत मुलाने लिहिलेले वाक्य पाहून शिक्षिकेला बसला धक्का

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून मंत्रालयात किती वेळा आले? राज्यात किती दौरे केले? राज्यावरील संकटात ते कधी बाहेर पडले. त्यामुळे मुख्यमंत्री आले काय किंवा नाही आले काय. राज्याला काही फरक पडणार नाही, असे रावसाहेब दानवे म्हणाले. कुठल्याही कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचा ( Uddhav Thackeray) सहभाग नाही. हे सरकार तीन पक्षांचे आहे. मात्र, तिन्ही पक्ष मिळून निर्णय करीत नाही, असेही रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) म्हणाले.

विरोधी पक्षाने शेवटपर्यंत गोंधळ घातला

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी रोज सभागृहात आहे. आमचे सरकार सर्व विषयांवर चर्चा करायला तयार आहे. मात्र, विरोधी पक्षाने शेवटपर्यंत गोंधळ घातला. आधारकार्ड लिंक, मतदार नोंदणी या बिलाला विरोधकांचा विरोध आहे. आठ वर्षांत केंद्र सरकारने कृषी, रेल्वे, उद्योग क्षेत्रासह अनेक विषयात चांगले काम केले. परंतु, राज्य सरकार काहीच काहीच काम करू शकले नाही, असा आरोपही दानवे (Raosaheb Danve) यांनी केला.

raosaheb danve
नवीन कामगार कायदा लागू झाल्यास पगार आणि पीएफमध्ये होईल बदल

...तर काय झाल

देशावर परकीयांनी आक्रमणे केली. त्यावेळी हिंदूच्या भावना दुखावल्या. आता हिंदूंच्या भावनांसाठी गावांची नावे बदली तर काय झाल, असा प्रश्‍न रावसाहेब दानवे यांनी उपस्थित केला. औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हावे, हीसुद्धा आमचीच मागणी असल्याचेही दानवे म्हणाले. हैदराबादचे नाव भाग्यनगर केले जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()