Celiac Disease : दुर्मीळ सेलिआक आजारावर महिलेने केली मात ; डॉक्टरांच्या प्रयत्नांना मिळाले यश

पोटातील लहान आतड्यांमधून पोषक द्रव्ये शोषून घेण्यात अडचण निर्माण करीत आपल्याच रोगप्रतिकारक शक्तीशी लढणाऱ्या ऑटोइम्यून डिसिजच्या दुर्मीळ आजार असलेल्या ५३ वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करीत तिचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांच्या पथकाला यश मिळाले. वैद्यकीय परिभाषेत सेलिआक आजार भारतात दुर्मीळ मानला जातो.
Celiac Disease
Celiac Diseasesakal
Updated on

नागपूर : पोटातील लहान आतड्यांमधून पोषक द्रव्ये शोषून घेण्यात अडचण निर्माण करीत आपल्याच रोगप्रतिकारक शक्तीशी लढणाऱ्या ऑटोइम्यून डिसिजच्या दुर्मीळ आजार असलेल्या ५३ वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करीत तिचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांच्या पथकाला यश मिळाले. वैद्यकीय परिभाषेत सेलिआक आजार भारतात दुर्मीळ मानला जातो. ऑटोइम्यून डिसऑर्डर असलेल्या या आजारात आपल्याच शरिरातल्या पेशी आपल्याच रोगप्रतिकारक शक्तीशी झुंज देतात. जनुकात झालेल्या आनुवांशिक बदलामुळे पाश्चिमात्य देशांमध्ये हा सामान्य आजार आहे. सेलिआक गहू, बार्ली, ओट्स आणि राईमध्ये आढळणाऱ्या ग्लुटेनच्या संवेदनशीलतेमुळे उद्भवणारा एक ऑटोइम्यून डिसऑर्डर आहे.

काटोल येथील ही ५३ वर्षीय महिला दोन वर्षांपासून या आजाराशी लढत होती. वारंवार अशक्तपणाचा त्रास झाल्याने कुटुंबियांनी अनेक ठिकाणी उपचार केले. नांगिया स्पेशालिटीच्या अमेरिकन ऑन्कोलॉजी इन्स्टिट्यूटमधील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. अतुल गावंडे, डॉ. अमित धवन यांनी रक्तातल्या लोह पेशीची कमी होऊन लिव्हर एन्झाईम्सचा त्रास असल्याचे निदान केले.

Celiac Disease
Nagpur Crime News : मुलाच्या गोळीबारात आई गंभीर जखमी ; आर्थिक वाद विकोपाला, पोलिसांनी मुलाला केली अटक

एंडोस्कोपीत महिलेला लहान आतड्याच्या श्लेष्मल त्वचेचे स्कॅलोपिंग दिसल्याने उपचार करीत डॉक्टरांनी आजारातून मुक्त केले. या आजाराची माहिती देताना डॉ. गावंडे म्हणाले, गहू, बार्ली, ओट्स आणि तांदळात आढळणाऱ्या ग्लुटेनमुळे हा ऑटोइम्यून डिसऑर्डर होतो. ग्लूटेन-फ्री आहार सेवन करणे हाच या आजाराचा एकमेव उपाय आहे.

ऑटोइम्यूनचे ८० पक्षा जास्त आजार

स्वंयप्रतिरक्षित अर्थात ऑटोइम्यून आजारांचे ८० पेक्षा जास्त प्रकार आहेत. यापैकी काहींचे लक्षणे सारखे आहेत.याचे निदान करणे खूपच कठीण आणि त्रासदायक आहे. या आजाराचे सुरुवातीचे लक्षणे थकवा, मांसपेशीमध्ये दुखणे आणि हलका ताप असे आहेत. या आजाराचे मुख्य लक्षण म्हणजे दाह आहे, ज्यामुळे लाली, जळजळ, दुखणे आणि सूज येऊ शकते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.