World Bamboo Day : ५० रुपयांच्या गुंतवणुकीतून सातासमुद्रापार झेप!

World Bamboo Day : ५० रुपयांच्या गुंतवणुकीतून सातासमुद्रापार झेप!
Updated on

नागपूर : प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीची तयारी असेल तर कोणत्याही क्षेत्रात प्रगती करता येऊ शकते. चंद्रपुरात राहणाऱ्या मीनाक्षी व मुकेश या वाळके दाम्पत्याने ते सिद्ध करुन दाखविले. त्यांनी अवघ्या ५० रुपयांच्या गुंतवणुकीतून बांबूपासून सजावटीच्या विविध आकर्षक वस्तू बनविण्याच्या सुरू केलेल्या व्यवसायाने अल्पावधीतच सातासमुद्रापार झेप घेतली आहे.

केवळ बारावीपर्यंत शिकलेले आणि हस्तशिल्प व कलेची आवड असलेले वाळके दाम्पत्य चंद्रपूरच्या बंगाली झोपडपट्टीमध्ये वास्तव्यास आहेत. तीन वर्षांपूर्वी उदरनिर्वाहासाठी कोणता तरी व्यवसाय करावा, असा विचार मनात आल्यानंतर त्यांनी बाजारातून ५० रुपयाला एक बांबू आणला. त्यापासून घरगुती उपयोगाची वस्तू तयार केल्यानंतर त्यांची रुची वाढत गेली. हळूहळू आणखी बांबू खरेदी करून विविध वस्तू बनविणे सुरू केले.

World Bamboo Day : ५० रुपयांच्या गुंतवणुकीतून सातासमुद्रापार झेप!
गरिबीवर मात करीत दोहतरे करतेय स्वप्नांचा जिद्दीने पाठलाग!

वाळके दाम्पत्य बांबूपासून बास्केट्स, फोल्डिंग लॅम्प, आकाशदिवे, कँडल स्टॅण्ड, फ्रेंडशिप बँड, ज्वेलरी, बॉटल्स, की-चेन, फुलदाणी, पूजा थाळी, मूर्त्या, तोरण, पताका, ताट, वाटी, चमचे, गिफ्ट बॉक्स व राख्यांसह जवळपास ५० प्रकारच्या शोभिवंत व घरगुती उपयोगाच्या आकर्षक वस्तू तयार करतात.

शिवाय वर्षभर सणासुदीच्या काळातही ते विविध वस्तू बनवित असतात. त्यांनी तयार केलेल्या वस्तूंनी देशविदेशातील अनेक घरांची शान वाढविली आहे. प्लॅस्टिकचा उत्तम पर्याय असलेल्या या स्वदेशी व टिकाऊ वस्तू पर्यावरणपूरक असून चीनी उत्पादनांची मक्तेदारी मोडून काढण्यास सहाय्यक ठरत आहे.

आदिवासी महिलांनाही दिला रोजगार

वाळके दाम्पत्याने या व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःची तर प्रगती साधलीच, शिवाय जिल्ह्यातील इतरही अनेक गोरगरीब आदिवासी महिला व मुलींना रोजगार मिळवून दिला आहे. व्यवसाय वाढल्यानंतर त्यांनी अनेक महिलांना बेसिक ट्रेनिंग देऊन यात तज्ज्ञ बनविले आहे.

चंद्रपूरचा युरोपमध्ये डंका

मीनाक्षी व मुकेश यांनी रक्षाबंधनानिमित्त बांबूच्या ईको फ्रेंडली राख्या बनविल्या होत्या. जवळपास दोन हजार राख्या त्यांनी इंग्लंड, स्वित्झर्लंड, हॉलंड, स्वीडन, फ्रांस, कॅनडा, डेन्मार्क व ऑस्ट्रेलिया या युरोपियन देशांमधील भारतीयांना निर्यात केल्या. शिवाय भारतातही पंधरा हजारांवर राख्यांची विकल्याचे मुकेश यांनी सांगितले.

World Bamboo Day : ५० रुपयांच्या गुंतवणुकीतून सातासमुद्रापार झेप!
टेकडी गणेश मंदिर : राजे भोसले यांनी केले बांधकाम!

व्यवसायाला हातभाराची गरज

आजच्या घडीला चंद्रपूर जिल्ह्यात बांबूला कल्पवृक्षाचे महत्त्व आले आहे. त्यामुळे या व्यवसायाला हातभार लावण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. पूर्वोत्तर भारतातील आसाम, त्रिपुरा व अन्य राज्यांतील सरकार तेथील व्यावसायिकांना भरपूर मदत करतात. मात्र, महाराष्ट्रात ते घडताना दिसत नाही. यासंदर्भात राजकारण्यांनी पुढाकार घेतल्यास विदर्भातही बांबूची क्रांती घडू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.