World Book Day 2024 : कास्ट प्राईड पुस्तकात सामाजिक अन् कायदेशीर सुधारणांचा ऐवज

World Book Day 2024 : ‘कास्ट प्राईड’ हे पुस्तक म्हणजे सामाजिक, कायदेशीर सुधारणांचा बहुमूल्य दस्तऐवज म्हटले पाहिजे.
World Book Day 2024
World Book Day 2024esakal
Updated on

मी वाचलेलं पुस्तक - कास्ट प्राईड (लेखक - मनोज मित्ता)

बैजवाडा विल्सन (सामाजिक कार्यकर्ते)

World Book Day 2024 : आपल्याला जन्मत: मिळते ती जात. इतिहासात डोकावले असता जातीवर आधारित अनेक पुस्तके वाचायला मिळतील. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पर्वावर प्रकाशित झालेले पत्रकार, लेखक मनोज मित्ता यांनी लिहिलेले ‘कास्ट प्राईड’ हे पुस्तक म्हणजे सामाजिक, कायदेशीर सुधारणांचा बहुमूल्य दस्तऐवज म्हटले पाहिजे.

मित्ता यांनी यापूर्वी १९८४ च्या शीख हत्याकांडावर पुस्तके लिहिली आहेत. स्वतंत्र भारतातील जातीसंबंधित कायद्यांवरील कायदेविषयक वादविवाद, मग ते नागरी किंवा फौजदारी यावर लेखकाने या पुस्तकातून प्रकाश टाकला आहे.

१८९५ म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या काळापासून कायद्यात कसे बदल होत गेले, ॲट्रॉसिटी कायद्यामुळे काय परिवर्तन झाले, बिहारमधील हिंसाचाराचे प्रकरण, आंध्रप्रदेशच्या सुंदूर येथील घटना किंवा भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी येथील अत्याचाराचे प्रकरण या प्रकरणात तपासाची गती आणि एकंदरीत कायद्याच्या घडामोडींवर लेखकने प्रकाश टाकला आहे.

‘कास्ट प्राईड’ पुस्तक कनिष्ठ जातींवरील हत्या आणि हिंसाचाराच्या घटनांकडे पाहताना स्वातंत्र्योत्तर भारतातील कायदेशीर आणि कायदेविषयक संदर्भात जातीय पूर्वग्रहांवर संभाषण आणि महत्त्वाच्या खुणांद्वारे मार्गक्रमण करते. १९६८ मध्ये तामिळनाडूच्या किलवेनमनी गावात १९६८ मध्ये हरिजनांविरुद्ध जमावाच्या हिंसाचाराची पहिली नोंद करण्यात आली.

जिथे ४२ लोक, बहुतेक महिला आणि मुले, जिवंत जाळण्यात आले होते, तसेच १९७७ मध्ये बेलछी हत्या ज्यामध्ये ११ लोक होते ज्यात आठ कनिष्ठ जातीचे होते. ज्यांना जमावाने मारले. दलितांविरुद्धच्या हिंसाचारात झालेली वाढ आणि स्वातंत्र्यानंतर जातीय सुधारणांनंतरही त्याबद्दलची सामान्य शिक्षा, हे वसाहतवादी काळातील हिंदू समाजात न सुटलेल्या लढायांचे परिणाम होते, हे लेखकाच्या लक्षात आले. तेच त्यांनी या पुस्तकात उतरवले आहे.

World Book Day 2024
World Book Day 2024 : जीवन संस्कृतीशी चिंतनशील नाते जोडणारे ‘शुष्क नद्यांचे आक्रोश’

पुस्तकातून काय प्रेरणा मिळते?

जातीसंदर्भातील कायदेशीर सुधारणांचा हा महत्त्वपूर्ण दस्तऐवज म्हणता येईल. कायदे आणि सुधारणांबाबत अभ्यास करण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

माझं ऑल टाईम फेव्हरेट पुस्तक - प्राचीन भारतीय इतिहास (लेखिका - रोमिला थापर)

वाचलीच पाहिजे अशी पुस्तके

१) जातिव्यवस्थेचे निर्मूलन - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

२) फ्रीडम अ‍ॅट मिडनाईट - डॉमिनिक लॅपियर

३) आई हैव बिकम द टाइड - गीता हरिहरन

४) एव्हरीबडी लव्हज अ गुड ड्रॉफ्ट - पी साईनाथ

५) अनसिन - भाषा सिंग

World Book Day 2024
World Book Day 2024 : ‘पॉलिटिक्स ऑफ हेट’ पुस्तकातून धर्मांध शक्तीचा समाचार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()