World Book Day 2024 : ‘पॉलिटिक्स ऑफ हेट’ पुस्तकातून धर्मांध शक्तीचा समाचार

World Book Day 2024 : आशिया खंडातील धर्मांध शक्तींनी देशात भेदभाव आणि दुफळी कशी निर्माण केली याचे वास्तव यात मांडले आहे. हे पुस्तक वास्तववादी असून ते दिशादर्शक आहे.
World Book Day 2024
World Book Day 2024 esakal
Updated on

मी वाचलेलं पुस्तक - पॉलिटिक्स ऑफ हेट (संपादन - फराहनाज इस्पहानी)

ॲड. रवी डंभारे, विश्लेषक

World Book Day 2024 : पुस्तकाचा व्यासंग विचारात प्रगल्भता आणतोच. पण कधी-कधी वास्तवात काय घडले आणि त्याचा परिणाम मानवी जीवनावर कसा घडतो, याचा उत्तम दाखला ‘पॉलिटिक्स ऑफ हेट - रिलिजीअस मेजॉरिटेरिअनिस्म इन साउथ एशिया’ या पुस्तकातून दिला आहे. आशिया खंडातील धर्मांध शक्तींनी देशात भेदभाव आणि दुफळी कशी निर्माण केली याचे वास्तव यात मांडले आहे. हे पुस्तक वास्तववादी असून ते दिशादर्शक आहे.

पॉलिटिक्स ऑफ हेट या पुस्तकाचे संपादन फराहनाज इस्पहानी यांनी केले आहे. हा शोध निबंध २०२३ मध्ये प्रकाशित झाला. जगातील विविध क्षेत्रातील निष्णात लेखकांचे ११ लेख यात आहेत. मीडिया आणि राजकीय नेत्यांची स्वतःच्या फायद्यासाठी द्वेष पसरविणे तसेच द्वेष वाढविणे या विषयावर हे लेख आहेत. दक्षिण आशियामधील राष्ट्र जसे भारत, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका यांच्या वास्तव स्थितीचे वर्णन यात केले आहे.

या देशातील धार्मिक, वांशिक भेदभाव कशाप्रकारे वाढत असून यामुळे हे देश कशाप्रकारे अधोगतीला जात आहेत, याचे विश्लेषण यात केले आहे. धर्मांधता, वर्णभेद यामुळे देशाचा विकास खुंटला असून २१ व्या शतकात ही धर्मांधता, वर्णभेद कमी होण्याऐवजी वाढत असल्याची भीती व्यक्त केली आहे.

World Book Day 2024
World Book Day 2024 : जीवन संस्कृतीशी चिंतनशील नाते जोडणारे ‘शुष्क नद्यांचे आक्रोश’

पुस्तकातून काय प्रेरणा मिळते?

देशासह जगात सध्या अनेक सामाजिक व राजकीय समस्या आपण बघत आहोत, अनुभवत आहोत. या समस्या समजून घेण्याची प्रेरणा हे पुस्तक देते.

माझं ऑल टाईम फेव्हरेट पुस्तक - प्राचीन भारतातील क्रांती तथा प्रतिक्रांती - (लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर)

वाचलीच पाहिजे अशी पुस्तके

१) व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव्ह डन टू द अनटचेबल्स - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

२) ट्रान्स्फर ऑफ पॉवर इन इंडिया - व्ही. पी. मेनन

३) स्टेट्स ॲन्ड मायनॉरिटीज - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

४) लॉर्ड बुद्धा ॲन्ड हीच धम्मा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

५) बुद्ध की कॉल मार्क्स - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

World Book Day 2024
World Book Day 2024: तंत्रज्ञानाने प्रकाशक, वाचनसंस्कृतीला उभारी; पुस्तक प्रकाशन संस्थांतील तज्ज्ञांनी व्यक्त केला विश्वास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()