Yavatmal: मोबाईल हरवला म्हणून परप्रांतीय मजूराचा खून! झाडीत फेकला मृतदेह, असा झाला प्रकरणाचा खुलासा

मोबाईल हरविल्याने झालेल्या वादात मध्य प्रदेशातील मजुराचा खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (ता.२५) रात्री साडेआठ वाजता येथील वेनेशियन पार्क ते डोर्ली रोडवर घडली.
Yavatmal: मोबाईल हरवला म्हणून परप्रांतीय मजूराचा खून! झाडीत फेकला मृतदेह, असा झाला प्रकरणाचा खुलासा
Updated on

Yavatmal Crime: मोबाईल हरविल्याने झालेल्या वादात मध्य प्रदेशातील मजुराचा खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (ता.२५) रात्री साडेआठ वाजता येथील वेनेशियन पार्क ते डोर्ली रोडवर घडली.


रामपालसिंह सिधनसिंह टेकाम (वय ४५, रा. लमसारी, मध्य प्रदेश) असे मृताचे नाव आहे. दिनेश विश्‍वनाथ यादव (वय ३५, रा. टिकरो, मध्य प्रदेश) असे मारेकऱ्याचे नाव आहे. मध्य प्रदेशातील जवळपास २० मजूर वेनिशीयन पार्क येथे मागील सहा महिन्यांपासून कामाला आहेत.

एक महिन्यापूर्वी रामपालसिंह हादेखील याच ठिकाणी काम करण्यासाठी आला होता. सोमवारी (ता.२५) दुपारी पाच वाजता दिनेश यादव याचा मोबाईल हरविला. त्यामुळे त्याने मजुराला शिव्या देणे सुरू केले. त्याला हटकण्यात आल्याने घनश्याम शिवचरणसिंह टेकाम याचा मोबाईल हिसकला. (Latest Marathi News)

त्यानंतर रामपालसिंह व दिनेश दोघेही साहित्य आणण्यासाठी डोर्ली येथे गेले.मात्र, तेथे एकटा दिनेशच दिसून आला. त्यामुळे पुतण्या घनश्यासिंह याने काका रामपालसिंह यांच्याबाबत विचारणा केली असता, दिनेशने टोलवाटोलवीचे उत्तर दिले. मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तोदेखील बंद दाखवत होता. मजुरांनी शोध घेणे सुरू केले. डोर्ली रोड ते वेनेशियन पार्क परिसरात एका झुडपात रामपालसिंहचा मृतदेह आढळून आला

Yavatmal: मोबाईल हरवला म्हणून परप्रांतीय मजूराचा खून! झाडीत फेकला मृतदेह, असा झाला प्रकरणाचा खुलासा
Israel Embassy Incident : दिल्लीतील इस्त्रायली दुतवासाबाहेरील स्फोट प्रकरणात मोठी अपडेट! CCTVमध्ये आढळले 2 संशयित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.