Yavatmal: शेतकऱ्याने तहसिलदारासमोर काढली विषाची बाटली अन्... उचललं टोकाचं पाऊल

न्यायासाठी दाद मागणाऱ्या शेतकऱ्याने तहसिलदारासमोर उचललं टोकाचं पाऊल, पण पोलिसांकडून शेतकऱ्याला अटक
Yavatmal: शेतकऱ्याने तहसिलदारासमोर काढली विषाची बाटली अन्... उचललं टोकाचं पाऊल
Updated on

Yavatmal Crime: न्यायासाठी कित्येक महिन्यांपासून येरझारा मारणाऱ्या शेतकऱ्याने आज (ता.एक) अखेरीस तहसीलदारांच्या कक्षात विषारी औषध घेऊन जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी तहसीलदार परसराम भोसले यांनी पोलिसी बळाचा वापर करीत शेतकऱ्याला पोलिसांच्या स्वाधीन करून त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

नववर्षाच्या पहिल्या दिवशी दुपारी साडे बारा दरम्यान ही घटना घडली. गौतम विलास गेडे (वय३१, रा. जवळा) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे गौतम गेडे. ह्या शेतकऱ्याच्या शेतात इतर काही लोकांनी नाला वळविल्यामुळे त्याच्या शेतीचे नुकसान होत आहे. याबाबत गडे यांनी तहसील कार्यालयात तक्रार दिली.

परंतु, त्यावर योग्य ती कारवाई होत नसल्यामुळे मी विष पिऊन आत्महत्या करेल, अशी धमकी सदर शेतकऱ्याने दिली. त्यावर तहसीलदारांनी शासकीय कामकाज करण्यापासून परावृत्त केले. शासकीय कामात अडथळा निर्माण केला, अशी तक्रार पोलिसांत दिली. त्यावरून पोलिसांनी सदर शेतकऱ्याला अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले. या प्रकरणी तहसीलदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.(Latest Marathi News)

न्याय न देता अटक करणे दुर्दैवी
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्याला अशाप्रकारे अटक होणे दुर्दैवी आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शासकीय अधिकारी, तहसील कार्यालय यांच्याकडे जाऊच नये का०, हा प्रश्‍न निर्माण होतो.

Yavatmal: शेतकऱ्याने तहसिलदारासमोर काढली विषाची बाटली अन्... उचललं टोकाचं पाऊल
HUL GST Notice: हिंदुस्थान युनिलिव्हरला जीएसटीने पाठवली 447 कोटी रुपयांची नोटीस; काय आहे प्रकरण?

कित्येक महिन्यांपासून शासन त्या शेतकऱ्याला न्याय देऊ शकले नाही. म्हणून तो आत्मदहन करण्याच्या मानसिकतेत आला. हे प्रकरण आर्णीचे तहसीलदार, ठाणेदार सामंजस्यातून सोडवू शकले असते. परंतु, त्यांनी तसे न करता त्या शेतकऱ्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. शेतकऱ्यांची ही मुस्कटदाबी असून निषेधार्थ कारवाई आहे. (Latest Marathi News)

जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या संयमाची अधिक परीक्षा न घेता त्वरित अशा अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवावा.- मनीष जाधव, जिल्हाध्यक्ष , स्वाभिमानी शेतकरी संघटना.

Yavatmal: शेतकऱ्याने तहसिलदारासमोर काढली विषाची बाटली अन्... उचललं टोकाचं पाऊल
Fire Accident News: झोपेत असताना घर पेटलं अन्...; संपुर्ण कुटुंबाचा होरपळून मृत्यू, गर्भवती महिलेसह २ लहान मुलांचा समावेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.