Yavatmal Molestation Case: विनयभंगप्रकरणी आरोपीस तीन वर्षांची शिक्षा दुसऱ्याला साधा कारावास, सत्र न्यायालयाचा निकाल

विनयभंगप्रकरणी आरोपीला तीन वर्षांची शिक्षा झाली. तर, पीडितेच्या आईला जिवे मारण्याची धमकी दिल्याने दुसऱ्या आरोपीला तीन महिने साधा कारावास, असा निकाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी दिला.
Yavatmal Molestation Case: विनयभंगप्रकरणी आरोपीस तीन वर्षांची शिक्षा दुसऱ्याला साधा कारावास, सत्र न्यायालयाचा निकाल
Updated on

Yavatmal Molestation Case: विनयभंगप्रकरणी आरोपीला तीन वर्षांची शिक्षा झाली. तर, पीडितेच्या आईला जिवे मारण्याची धमकी दिल्याने दुसऱ्या आरोपीला तीन महिने साधा कारावास, असा निकाल आज बुधवारी (ता.१७) येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी दिला.

चंद्रशेखर सुरेशराव डंभारे (वय ४१, रा. राळेगाव), साहिल धनपाल कांबळे (वय २०, रा. राळेगाव) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. २० जानेवारी २०२२ रोजी अल्पवयीन मुलगी किराणा दुकानात सामान आणण्यासाठी आली असता, चंद्रशेखर याने मागाहून येत विनयभंग केला.

साहिल याने पीडित मुलीच्या आईला जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडितेच्या आईने राळेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. तपासाअंती तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक मोहन पाटील यांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. (Latest Marathi News)

या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडित, आई, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, तपास अधिकारी यांचे पुरावे ग्राह्य मानण्यात आले. चंद्रशेखर यास विनयभंग केल्याप्रकरणी तीन वर्षे कारावासाची शिक्षा व एक हजार रुपये दंड, साहिल याला भादंविचे कलम ५०६ अंतर्गत तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा व ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील संदीप दर्डा यांनी काम पाहिले.

Yavatmal Molestation Case: विनयभंगप्रकरणी आरोपीस तीन वर्षांची शिक्षा दुसऱ्याला साधा कारावास, सत्र न्यायालयाचा निकाल
Ayodhya Ram Mandir : आजपासून घेता येणार रामलल्लाचं दर्शन! जाणून घ्या आरतीची वेळ अन् बुकिंगची प्रक्रिया..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()