Yavatmal ST Hostel Corruption: येथील शासकीय आदिवासी वसतीगृह क्रमांक ३ मध्ये गृहप्रमुखाने शासकीय पदाचा गैरवापर करून प्रकल्प अधिकाऱ्यांच्या बनावट शिक्का व स्वाक्षरीने १९ लाख ७६ हजार ९७६ रुपयांचा अपहार केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. या प्रकरणी लोहारा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन भगवंतराव आजणकर (वय ४२, रा. आदिवासी मुलांचे वसतीगृह क्रमांक ३, रंभाजी नगर, यवतमाळ) असे फिर्यादीचे नाव आहे. तर राजू रामचंद्र राठोड (वय ५२, रा. रुद्राक्ष कॉलनी, जाम रोड, यवतमाळ) असे अपहार करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. सदर कर्मचारी हा रंभाजी नगर येथील शासकीय वसतिगृह क्रमांक तीन येथे गृहप्रमुख या पदावर कार्यरत आहे.
फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २८ जानेवारी २०२२ ते १ ऑगस्ट २०२३ या कालावधीत शासकीय मुलांच्या वसतिगृह क्रमांक तीनमध्ये आरोपी राजू राठोड यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला. यावेळी राजू राठोड याने प्रकल्प अधिकाऱ्यांच्या बनावट सही व बनावट शासकीय शिक्क्याच्या आधारे पाण्याचे देयके, उपयुक्त साधनसामुग्री व इतर साहित्याची वेगवेगळी बनावट देयके तयार केली. (Latest Marathi News)
एव्हढेच नव्हे तर अमरावती कोषागार कार्यालयात बनावट बिले सादर केली. ही बाब प्रकल्प अधिकारी यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात प्रकल्पअधिकारी यांनी एक समिती तयार करून संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागविला. यात राजू राठोड याने १९ लाख ७६ हजार ९७६ रुपयांचा अपहार केल्याचे दिसून आले.
त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी गृहप्रमुखाविरोधात पोलिसांत तक्रार देण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार गृहपाल सचिन आजणकर यांनी लोहारा पोलिसात या प्रकरणी रीतसर तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घटनेचा अधिक तपास लोहारा पोलिस ठाण्याच्या ठाणेदार मुनेश्वर करीत आहेत.(Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.