Yavatmal: मुलींनी केला वडिलांवर अंत्यसंस्कार; समाजाला नवी दिशा

वडिलांच्या अंत्यसंस्कारात दोघी मुलींनी तिरडीवर पाणी धरले व नंतर भडाग्नी दिला. समाजाला दिशा देण्याचा हा निर्णय तालुक्यातील सिनगाव जहागीर येथील बंगाळे कुटुंबाने घेतला असून या निर्णयाचे समाजात स्वागत होत आहे.
Yavatmal: मुलींनी केला वडिलांवर अंत्यसंस्कार; समाजाला नवी दिशा
Updated on

Yavatmal Last Rites of Father performed by Daughter : पूर्वीपासून समाजात मुलगा हाच वंशाचा दिवा या विचारांना तिलांजली देऊन वडिलांच्या अंत्यसंस्कारात दोघी मुलींनी तिरडीवर पाणी धरले व नंतर भडाग्नी दिला. समाजाला दिशा देण्याचा हा निर्णय तालुक्यातील सिनगाव जहागीर येथील बंगाळे कुटुंबाने घेतला असून या निर्णयाचे समाजात स्वागत होत आहे.

समाजातील जुन्या परंपरा व चाली रितींना बगल देणे आजच्या वैज्ञानिक युगात ही सहज शक्य होत नाही. मात्र वैज्ञानिक दृष्ट्या विचार करून चिकित्सकपणे सत्यशोध विचार अंगीकारण्याचा धाडसी निर्णय काहीजण घेऊ शकतात. असाच काहीसा प्रकार तालुक्यातील सिनगाव जहागीर येथे अनुभवास आला.

गावचे प्रतिष्ठित नागरिक साहेबराव रामराव बंगाळे (वय ७८) यांचे रविवारी निधन झाले. गावात पाटील म्हणून साहेबरावांच्या शब्दाला मान होता. विविध सामाजिक कार्यक्रमात त्यांचा पुढाकार असे. शब्दाला किंमत असणारे साहेबराव पाटील बंगाळे यांना दोन पत्नी व दोघींना एक एक मुली होत्या. एका मुलीचे नाव शारदा मराठवाड्यातील राजूरजवळील चांधई हे तिचे सासर तर लहान कमल टेकाळे हिचे सावंगी टेकाळे हे सासर आहे. (Latest Marathi News)

समाजात पेरली बदलाची नांदी

मुलगा नसल्याने आता अंत्यसंस्कार कोण करेल असा प्रश्न उपस्थित झाला. त्यावेळी दोन्ही मुली समोर आल्या. दोघींनी वडिलांच्या मृतदेहाला भडाग्नी दिला. शारदा आणि कमल या दोघी बहिणींना भाऊ नसल्याने त्यांनी आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कार विधीमध्ये एका मुलाप्रमाणे पुढाकार घेऊन समाजातील चालीरीतींना बगल दिली. एक सकारात्मक परिवर्तन घडविण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल टाकले. मुलगा हाच वंशाचा दिवा या समाजात पेरलेल्या विचाराला तिलांजली देत मुलगी हीच वंशाची पणती आहे असा विचार समाजासमोर उभा केला.

Yavatmal: मुलींनी केला वडिलांवर अंत्यसंस्कार; समाजाला नवी दिशा
Abhijeet Kelkar on Pushkar Jog: "माझी आईदेखील BMC कर्मचारी.....", पुष्करच्या विधानावर भडकला अभिनेता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()