वयाची १७ वर्ष पूर्ण झालीत?, मतदार ओळखपत्रासाठी असा करा अर्ज

मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या नेतृत्वाखालील सर्व राज्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तांत्रिक उपाय करण्याचे निर्देश
How to apply for voter id card
How to apply for voter id card
Updated on

जळगाव : निवडणूक आयोगाने आता युवा वर्गाला वयाच्या १७ व्या वर्षीच मतदार यादीत नाव नोंदणीसाठी अर्ज करण्याची परवानगी दिली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांच्या नेतृत्वाखालील आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तांत्रिक उपाय करण्याचे निर्देश दिले आहेत.

वर्षातून तीनदा अर्ज करता येणार

आता युवक वर्षातून तीनदा म्हणजे १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबरपासून आगाऊ अर्ज करू शकतात. यासाठी लाभार्थींना १ जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागणार नाही. त्यानंतर प्रत्येक तिमाहीत मतदार यादी अद्ययावत केली जाईल. वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्या वर्षाच्या पुढील तिमाहीत पात्र तरुणांची मतदार यादीत नोंदणी करता येईल.

मतदार यादी दुरुस्तीतही अर्ज

नोंदणीनंतर युवकांना एक निवडणूक फोटो ओळखपत्र जारी केले जाईल. यावेळी मतदार यादी २०२३ मध्ये दुरुस्ती केली जात आहे. १ एप्रिल, १ जुलै, १ ऑक्टोबर २०२३ रोजी १८ वर्ष पूर्ण झालेला कोणताही नागरिक, प्रकाशनाच्या शेवटच्या तारखेपूर्वी मतदार म्हणून नोंदणीसाठी आगाऊ अर्ज सादर करू शकतो.

आधारक्रमांक जोडणार

आधारनंबर मतदार यादीशी जोडण्याबाबत नोंदणी फॉर्ममध्ये मतदारांसाठी तरतूद करण्यात आली आहे. सध्याच्या मतदारांसाठी आधार नंबर लिंक करावा यासाठी नवीन फॉर्म ६ ‘ब’ आणला आहे. मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी कुठल्याही अर्जाला नकार देण्यात येणार नाही.

असा करा ऑनलाइन अर्ज

मतदार यादीत नाव असलेला प्रत्येक मतदार त्याचा आधार क्रमांक अर्ज क्र. ६ ‘ब’ मध्ये भरून देऊ शकतो. या अर्जाच्या छापील प्रती मतदारांना उपलब्ध केल्या जातील. याशिवाय अर्ज क्रमांक ६ ‘ब’ हा भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध होईल. नमुना अर्ज क्र. ६, ७ व ८ मध्ये १ ऑगस्टपासून सुधारणा करण्यात येत आहेत. नमुना ६ ‘ब’ नव्याने तयार केला आहे. सुधारित अर्जानुसारच मतदारांनी मतदार यादीतील बदल अथवा नोंदणीची प्रक्रिया करावयाची आहे.

१७ वर्ष पूर्ण झाल्यानंतर युवकांना मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करता येणार आहे. मात्र त्यांचे नाव मतदार यादीत येणार नाही. ते त्यांचे १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर येईल. त्यांचे १८ वर्ष पूर्ण होताच मतदार यादीत नाव येऊन त्यांना मतदार ओळखपत्र घरपोच मिळेल.

- तुकाराम हुलवळे उपजिल्हाधिकारी, निवडणूक विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.