Nagpur crime : मोटारसायकल धडकल्याने वादात युवकाचा खून...दोन जण जखमी : अल्पवयीन आरोपी ताब्यात

Nagpur crime : नागपुरात मोटारसायकल धडकल्याने झालेल्या वादातून अल्पवयीन मुलाने युवकाचा खून केला, तसेच दोन जणांना जखमी केले.
Nagpur crime
Nagpur crime Sakal
Updated on

नागपूर : डिप्टी सिग्नल परिसरात रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास मोटारसायकल एकमेकांना धडकल्याने झालेल्या वादातून अल्पवयीन मुलाने तिघांवर चाकूने वार करून एकाचा खून तर दोघांना जखमी केले.

नागेश शाहू ( वय २२, रा. डिप्टी सिग्नल) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेश मित्रांसह मोटारसायकलने जात असताना त्याने समोर वाहन आल्याने ब्रेक मारला.

त्यामुळे मागून अल्पवयीन मुलाने दुचाकी धडकवली. या प्रकाराने दोघांमध्ये वाद होऊन हाणामारीही झाली. यात अल्पवयीन मुलाने चाकू काढून नागेश शाहू याच्यावर वार केले. याशिवाय त्याच्या साथीदाराला जखमी केले.

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी ताफ्यासह घटनास्थळी दाखल होऊन जखमींना मेयोत दाखल केले. पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. गुन्हा दाखल करून पोलिसांनी अल्पवयीन आरोपीस अटक केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.