कोंढाळी : उपराजधानी नागपूरवरुन फक्त ५० किलोमीटर अंतरावरील कोंढाळी नगरपंचायत हे नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर वसलेले नगर आहे. सद्या येथे व आजुबाजूच्या परिसरातील अनेक गावांमध्ये अनेक प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत..मात्र मागील एका वर्षापेक्षा जास्त काळापासून बंद असलेला एक अवैध धंदा म्हणजे विडीओ गेम्सच्या नावाखाली बेकायदेशीर बनावट कॅसिनो मागील अनेक महिन्यांपासून काटोल आणि कोंढाळीत पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू आहे.जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत महाराष्ट्रात ऑनलाईन कॅसिनो बेकायदेशीर आहेत, तथापि कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होतांना दिसत नाही. बेकायदेशीर सुरू असलेल्या कॅसिनो सेंटरकडून शासनाची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात असून कोट्यवधी रुपयांचा चुना लावण्यात येत आहे. यामुळे परिसरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर ऑनलाईन कॅसिनो बेधडक सुरू आहेत..हे आहेत धोकेखेळाडूंना कायदेशीर कारवाईचा धोका असू शकतो.जिंकलेले पैसे जप्त केले जाऊ शकतात.कुणीही व्यक्ती जिंकतांना दिसून येत नाही.मजूर, अल्पवयीन तरुण पिढी व वयस्कर पुरुष हे राबराब राबून कष्ट केलेला पैसा एका झटक्यात गमावून बसतात.अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त होऊन रस्त्यावर येण्याची वेळ आली.महिलांची आपबीतीकोंढाळी येथील एक रहिवासी महिलेने आपबीती सांगितली. ती म्हणाली, पतीचा छोटासा मच्छीमार व्यवसाय असून ते लहानशा खोलीत राहून जीवन जगत आहेत. मात्र पती वारंवार कॅसिनो सेंटरमध्ये जाऊन जुगार खेळून हजारो रुपये हरत असल्याने कर्जबाजारी झाले आहेत. यामुळे आम्हांला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे..२७ जुलैला कोंढाळी नगर पंचायतीमध्ये आढावा बैठक घेण्यात आली होती, तेव्हा उपस्थित आमदार अनिल देशमुख व ठाणेदार राजकुमार त्रिपाठी यांना विडीओ गेम्सच्या नावाखाली बेकायदेशीर कॅसिनो सेंटरवर जुगार खेळला जात असल्याची माहिती देऊनही आजपर्यंत कोणतीच चौकशी किंवा कारवाई करण्यात आली नाही, हे फार दुर्दैव आहे.-कपिल माकोडे, सामाजिक कार्यकर्तेआम्ही फक्त विडीओ गेम्सची परवानगी दिली आहे. जुगार खेळण्याची नाही.-राजू रणविर, तहसीलदार, काटोलयाबाबत आमच्याकडून कुठल्याही प्रकारची पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नाही, हे खरे आहे.-धनंजय बोरीकर, प्रशासकीय अधिकारी, कोंढाळी नगरपंचायतहे प्रकरण न्यायालयात सुरू असल्याचे कारण पुढे करून आम्हांला त्या ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे.-राजकुमार त्रिपाठी, ठाणेदार , कोंढाळी.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.