नागपूर : बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणी उद्यानात भारतीय सफारी लोकप्रिय झाल्यानंतर आता महाराष्ट्र वन विकास महामंडळ ( एफडीसीएम) आफ्रिकन सफारी सुरू करणार आहे. २१२ कोटींच्या आफ्रिकन सफारीचा मास्टर प्लॅन सध्या राज्य सरकारच्या प्रशासकीय मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. याला मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे. ही सफारी २६ जानेवारी २०२७ पर्यंत सुरू होण्याचे संकेत आहे.