"रेड्डीसारख्या बदमाश माणसाला वाचवण्यासाठी तुम्ही आल्या आहात?"; नवनीत राणा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर संतापल्या 

navneet Rana
navneet Rana
Updated on

अमरावती ः मेळघाटातील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्यानंतर मेळघाट व्याघ्रप्रकल्पाचे तत्कालीन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक व क्षेत्रसंचालक एम. एस. रेड्डी यांच्या समर्थनार्थ निवेदन देण्यासाठी आलेल्या वनविभागाच्या काही महिला व पुरुष कर्मचा-यांचा खासदार नवनीत राणा यांनी चांगलाच समाचार घेतला. अधिकाऱ्यांमुळे तुमच्याच एका महिला सहकाऱ्याला आत्महत्या करावी लागली असताना तुम्ही त्या अधिकाऱ्यांची  बाजूने कसे? असा सवालसुद्धा त्यांनी केला.

घरी निवेदन द्यायला आलेल्या महिला वनकर्मचाऱ्यांना खासदार राणा म्हणाल्या, रेड्डीसारख्या बदमाश माणसाला वाचवण्यासाठी तुम्ही आल्या आहात, निवेदनही आणले आहे. पण मी तुमचे हे निवेदन स्वीकारणार नाही. काय तुम्ही महिला आहात? त्या रेड्डीने दुर्लक्ष केल्यामुळे दीपालीला आत्महत्या करावी लागली. त्याला मी १० फोन केले, आमदार रवी राणा यांनीसुद्धा फोन केले आणि दीपाली यांना त्रस्त करणाऱ्या विनोद शिवकुमारवर कारवाई करण्यासाठी वारंवार सांगितले. पण त्यानं एक नाही ऐकलं आणि दीपालीला जीव गमवावा लागला. 

 अत्याचाऱ्याच्या बाजूनं उभे आहात  

तुम्हीसुद्धा महिला आहात, त्याच विभागात काम करीत आहात. हा अधिकारी आज आहे, उद्या दुसऱ्या जिल्ह्यात निघून जाईल. तुम्ही का म्हणून त्याला मदत मिळवून देण्यासाठी येथे आल्या आहात. एका महिलेला न्याय मिळवून देण्याच्या बाजूने राहण्याऐवजी त्या अत्याचाऱ्याच्या बाजूने उभे राहताना तुम्हाला काहीच कसे वाटत नाही?

अशी वेळ तुमच्यावर आली तर? 

तुम्ही आज अशा वागत आहात, उद्या तुमच्यावर अशी परिस्थिती आली, तर आमच्यासारखे लोक तुमच्या मदतीला येणार नाही. एक महिला म्हणून तुम्ही कशा या निवेदनावर सह्या केल्या. त्या शिवकुमारला तर शिक्षा होईलच, पण रेड्डीसुद्धा वाचला नाही पाहिजे, ही मागणी तुम्ही केली पाहिजे. त्याला फाशी द्या, अशी मागणी तुम्ही केली पाहिजे. तर तुम्ही हे भलतच का घेऊन आल्या. पालकमंत्र्यांनीही त्या अधिकाऱ्याच्या चौकशीची मागणी केली होती. तरीही रेड्डींनी शिवकुमारची चौकशी केली नाही. 

तरीही रेड्डीला पाझर फुटला नाही 

दीपाली रडूनपडून त्यांना वारंवार सांगत राहिल्या. पण रेड्डीला पाझर फुटला नाही. त्यामुळेच शेवटी दीपाली यांनी आत्महत्या केली. अशा महिलेबद्दल तुम्हाला काही वाटत नसेल, तर तुम्ही आपले निवेदन उचला आणि निघा येथून, असे महिलांना म्हणताना खासदार राणा यांचा संताप चांगलाच अनावर झाला होता.

संपादन - अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()