उघड्यावर धान खरेदी होणार नाही याचे नियोजन करा

उघड्यावर धान खरेदी होणार नाही याचे नियोजन करा
Updated on

गोंदिया : धानाचे उत्पादन लक्षात घेता साठवणुकीसाठी गोदामे कमी (Less warehouses for grain storage) पाडतात. त्यामुळे धानाचे नुकसान होते. भविष्यात उघड्यावर धान खरेदी होणार नाही, यादृष्टीने वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन गोदाम निर्मितीचा प्रस्ताव शासनाला सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री नवाब मलिक (Guardian Minister Nawab Malik) यांनी प्रशासनाला दिल्या. (nawab-malik-said-Plan-not-to-buy-grain-in-the-open)

जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. धान व मका खरेदीसाठी १५ दिवसांची मुदतवाढ मिळाली; तर नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण धान खरेदी होऊ शकते, अशी माहिती बैठकीत दिली असता, तातडीने प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश त्यांनी दिले. भरडाई बाबतीतही आढावा घेण्यात आला.

उघड्यावर धान खरेदी होणार नाही याचे नियोजन करा
विमानामुळे आमदारकीला मुकलेले सुबोध मोहिते राष्ट्रवादीत

वीज देयक प्रलंबित असल्यामुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला अथवा नोटीस आली अशा योजनांची देयक १५ व्या वित्त आयोगाच्या निधीमधून तातडीने भरावी. जिल्ह्याला तीनशे कोटींचे पीक कर्ज उद्दिष्ट असून आतापर्यंत १०८ कोटी रुपये पीक कर्ज वाटप करण्यात आले. राष्ट्रीयीकृत बँकांचे उद्दिष्ट कमी असून पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या बँकांमधील शासनाच्या ठेवी काढून घेण्याचा इशारा पालकमंत्र्यांनी दिला.

प्रयत्नांची प्रसंशा

यावर्षी दोन लाख हेक्टर खरिपाचे असून १० हजार हेक्टरवर भाताच्या रोपवाटिका टाकण्यात आल्या आहेत. खत आणि बियाण्यांचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गोंदिया जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या प्रयत्नांची प्रसंशा केली.

(nawab-malik-said-Plan-not-to-buy-grain-in-the-open)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.