गडचिरोलीतील आलापल्ली परिसरात आढळले नक्षली बॅनर; लिहिला आहे हा मचकूर

Naxal banner found in Alapally area of Gadchiroli
Naxal banner found in Alapally area of Gadchiroli
Updated on

आलापल्ली (जि. गडचिरोली) : आलापल्ली येथील नजीक असलेल्या वर्दळीच्या ३५३ क्रमांक राष्ट्रीय महामार्गावर बुधवारला सकाळच्या सुमारास मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना सिरोंचा पुलास लागून असलेल्या सागवानांच्या झाडांना लाल कापडी बॅनर प्लॅस्टिकच्या दोरीने बांधून असल्याचे आढळले.

या नक्षली बॅनर जवळ दोन काचेच्या बाटलीत पांढऱ्या रंगाची भुकटी भरून वायरच्या साहायाने लटकून आढळली. काचेच्या बाटलींमध्ये स्फोटक पदार्थ असावे, अशी शंका व्यक्त केली जात होती व तर्कवितर्काला उधाण आले होते. या बॅनरमध्ये ‘सी. 60 को चेतावणी.. झूठा सर्च अभियान चलाकर आदिवासीयोंके मकानो को जलाना बंद करो. खुद की झुठी प्रशंसा करके जनता की आखों मे धुल झोकना बंद करो. वरना इसका अंजाम भूगताना होगा.. भाकपा माओवादी अहेरी एरिया कमिटी’ असे लिहिलेले होते.

आलापल्ली-अहेरी मार्ग परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या स्थळापासून अवघ्या ४ किलोमीटरवर अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालय आहे. घटनेच्या ठिकाणी पोलिस दाखल झाले. त्यानंतर बी.डी.डी.एस. पथकाला पाचारण करून आजूबाजूच्या परिसराची तपासणी करण्यात आली. या सोबत श्‍वान पथकाद्वारे सुद्धा आजूबाजूला तपासणी करण्यात आली. बॉम्ब नसल्याची खात्री झाल्यावरच बी.डी.डी.एस. पथकाने बॅनर काढून ताब्यात घेऊन नष्ट केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()