आता कोरोनाचे अहवाल मिळणार वेळेत, आलंय नवीन तंत्रज्ञान

new software for corona report get earlier in amravati
new software for corona report get earlier in amravati
Updated on

अमरावती : कोरोना चाचणीचे अहवाल गतीने मिळण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत नवी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या लॅबकडून आता दिवसाला 1700 अहवाल मिळणार आहेत. आरोग्ययंत्रणेला अहवाल वेळेत मिळविण्यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअरही विकसित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बुधवारी (ता. तीन) या लॅबची पाहणी करून तज्ज्ञांशी चर्चा केली.

कोरोना प्रतिबंधासाठी स्थानिक पातळीवर अहवाल देणारी प्रयोगशाळा असावी म्हणून दहा महिन्यांपूर्वी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात लॅब सुरू करण्यात आली. पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी त्यासाठी निधी मिळवून दिला. सुरुवातीच्या काळात या लॅबमध्ये दिवसाला शंभर नमुने तपासले जात होते. मात्र, प्रादुर्भाव लक्षात घेता ही क्षमतावाढ करत एक हजारपर्यंत नेण्यात आली. दरम्यान, पीडीएमसीमध्येही चाचणीची सुविधा झाली. या कामाला आणखी गती मिळावी म्हणून आता विद्यापीठात नवी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे, अशी माहिती नवाल यांनी दिली.

सॉफ्टवेअर केले विकसित - 
लॅबकडून आरोग्ययंत्रणेला वेळेत अहवाल मिळण्यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर विकसित केले आहे. त्याचा युझर आयडी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाला उपलब्ध करून दिला जाईल. त्यामुळे लॅबकडे चाचणीच्या निष्कर्षाची नोंद झाल्यावर तत्काळ सॉफ्टवेअरच्या माध्यमातून या दोन्ही कार्यालयांना ऑनलाइन माहिती कळणार आहे. तथापि, रुग्णांना माहिती कळविणे, उपचार आदी कामे ही दोन्ही कार्यालये गतीने करू शकतील, असे कोविड-19 मॉलेक्‍युलर डायग्नोस्टिक लॅबचे नोडल अधिकारी डॉ. प्रशांत ठाकरे यांनी सांगितले.

निष्कर्ष लवकर कळतील -
आरटीपीसीआर चाचणी करणारी ऑटोमॅटिक एक्‍स्ट्रॅक्‍टरसह अद्यावत यंत्रणा दोन दिवसांपूर्वी कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे लॅबची क्षमता प्रतिदिवस 1700 पर्यंत वाढली आहे. नमुने आल्यापासून ते निष्कर्ष हाती येईपर्यंतच्या कालावधीतही यामुळे घट होणार आहे. त्यामुळे जलदगतीने निष्कर्ष हाती येतील व पुढील उपायांना चालना मिळेल, असे लॅबमधील तज्ज्ञ डॉ. सुधीर शेंडे यांनी सांगितले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.