अमरावती : सुखाचा सुरू असलेला संसार सोडून एका मुलीची आई अविवाहित युवकाच्या प्रेमात पडली अन् घरदार सोडून त्याच्यासोबत निघून गेली. त्याने तिला आठ वर्षे जवळ ठेवले. नंतर त्याने प्रेयसीला हाकलून दिले. आधी पतीला तिने, तर नंतर प्रियकराने तिला वाऱ्यावर सोडल्याने ती पोलिस ठाण्यात पोहोचली. परंतु, पोलिसांनीही तिला इकडून तिकडे चकरा मारायला लावल्याची घटना आज (ता. 28) उजेडात आली.
लग्नानंतर शहरातच ती पतीसोबत राहत होती. एक मुलगी झाली. पती स्वभावाने गरीब. परंतु, एका मुलीची आई झाल्यानंतर ती कापड दुकानात काम करणाऱ्या युवकाच्या प्रेमात पडली. तोही तिच्या घरी पतीसमोर चकरा मारायला लागला. विवाहितेच्या प्रेमात तो आकंठ बुडाला. घरी पती असताना त्याने त्यालाही जुमानले नाही. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. पतीसोबत तिचे पटत नव्हतेच. अन् प्रियकरालाही प्रेयसीची ओढ लागली. तो शहरातच भाड्याची खोली करून राहत होता.
प्रेमाच्या ओढीने ती राजापेठ येथून पतीला सोडून मुलीसोबत प्रियकराकडे आली. अन् लग्न न करता दाम्पत्याप्रमाणे ते राहू लागले. या काळात पतीनेही तिच्याकडे बघितले नाही. तिने पहिल्या पतीपासून घटस्फोटही घेतला नाही. आठ वर्षे विवाहित प्रेयसीसोबत राहिलेला प्रियकर गेल्या काही दिवसांपासून तिला टाळत होता. लॉकडाउनच्या काळात तो जिल्ह्यातील दुसऱ्या गावी गेला. कुटुंबीयांनी त्याचे लग्न एका युवतीसोबत जुळविले.
आज ही विवाहित प्रेयसी शेजारी राहणाऱ्या दोन महिलांसह प्रियकराच्या घरी गेली, त्याला जाब विचारला असता, त्याने लग्नास नकार देऊन तिला हाकलून लावले. तेथून तडक तिने राजापेठ पोलिस ठाणे गाठले. राजापेठ पोलिसांनी तिची तक्रार गांभीर्याने न घेता, घटनास्थळ फ्रेजरपुरा हद्दीत असल्याचे सांगून तिला फ्रेजरपुरा ठाण्यात जाण्यास भाग पाडले. फ्रेजरपुरा पोलिसांनी ही घटना राजापेठ परिसरापासून सुरू झाल्याने तिला पुन्हा राजापेठ ठाण्यात तक्रार नोंदविण्यास सांगितले. एवढेच नव्हे तर, संबंधित गाव ज्या ठाण्याच्या हद्दीत येते तेथे जाऊन तक्रार देण्याचा सल्लाही दिला.
पतीपासून घटस्फोट घेतला नाही, ज्याच्यासोबत आठ वर्षे राहिली त्याच्या सोबतही अधिकृत लग्न केले नाही. त्यामुळे प्रियकराचे होणारे लग्न कसे थांबवावे, या विवंचनेत ती चांगलीच भांबावून गेली होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.