वर्धा : विधानसभा निवडणुकीदरम्यान काल उमरी (मेघे) येथे भाजप कार्यकर्त्यांकडून माझ्यासह पत्नीवर जीवघेणा हल्ला झाला. या प्रकरणी तक्रार नोंदविण्यासाठी सावंगी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करीत रात्री दीड वाजेपर्यंत ठाण्यातच बसवून ठेवले.