वर्धा : सध्या विरोधकांकडून कापूस, सोयाबीनला भाव नसल्याचा कांगावा करण्यात येत आहे. ते खरे आहे. परंतु, शेतकऱ्याने आता केवळ अन्नदाता राहून चालणार नाही, त्याने ऊर्जादाता व्हावे. त्याच्याकडे असलेल्या साधनाचा वापर त्यांनी करून ऊर्जा निर्माण करावी, तसे प्रकल्प केंद्राचे आहे, असे विचार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वर्धेत मांडले.