सिरोंचा(जि. गडचिरोली) : आपला भारत देश आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकीय, सामाजिक, आर्थिक अशा प्रत्येक क्षेत्रात आपला देश उत्तरोत्तर प्रगती करतो आहे. अगदी चंद्र आणि मंगळ यांच्या सारख्या लाखो किलोमीटर दूर असणाऱ्या ग्रहांवर आपला देश भरारी घेतोय. मात्र आपल्याच देशात काही गाव असे आहेत ज्यांच्यापर्यंत मॉडर्न भारत अजून पोहाचलेलाच नाही. अशाच एका गावाची ही व्यथा आहे.
गडचिरोलीच्या सिरोंचा तालुका मुख्यालयापासून जवळच असलेले आमडेली हे गाव. भारटाळा स्वातंत्र्य मिळून तब्बल सात दशके उलटूनही या गावाने अजूनही 'विकास' नावाचा शब्दही ऐकलेला नाही. या गावात अनेक समस्या असून गावकरी अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले आहेत.
आमडेली हे गाव सिरोंचा-आलापल्ली या मुख्य आणि राष्ट्रीय महामार्गापासून बारा किमी अंतरावर असून या गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता उपलब्ध नाही. पक्का रस्ता नसल्याने राज्य परिवहन महामंडळाची बससुद्धा अजूनपर्यंत येथे पोहोचली नाही. नागरिक सिरोंचा तालुका मुख्यलयी पायदळ येत असतात. गाव जंगलात असल्याने या घनदाट जंगलातून पायी येत असताना वन्यजीवांच्या भीतीने जीव धोक्यात घालून यावे लागते. गावात वीजपुरवठा नसल्याने रात्री विषारी साप व विंचवासारख्या जिवांपासून जीव वाचवत जगावे लागत आहे.
या गावात विजेची सोय होऊन अनेक वर्षे झाली. पण नागरिकांना अजूनही याचा लाभ मिळू शकला नाहीये. शासनाच्या दुर्लक्षामुळे येथे वीजपुरवठा होत नाही. त्यामुळे प्रकाश बघणे या गावातील लोकांच्या नशिबात नाही. गावातील नागरिकांना अंधाराचा सामना करत जीवन जगावे लागत आहे. तसेच गावात वीजपुरवठा नसल्याने रात्री विषारी साप व विंचवासारख्या जिवांपासून जीव वाचवत जगावे लागत आहे.
निजमाबद-मंचेरीयाल-सिरोंचा-आमडेली-कोपेला-भोपलपट्टनम व छत्तीसगडमार्गे जगदलपूर, असे सर्वेक्षण होऊन महामार्ग झाला तरी गावातील समस्या सुटलेल्या नाहीत. आता गावातून महामार्ग जात असल्याने गावाचा चेहरा-मोहरा बदलणार, असेही येथील ग्रामस्थांना वाटत होते. मात्र, हा महामार्ग सिरोंचा-असरअल्ली-भोपलपट्टनममार्गे जगदलपूर गेल्याने या दोन्ही गावांचा विकास रखडला आहे.
शासनाकडून दरवर्षी ग्रामपंचायतीला गावविकासासाठी आमदार निधी, खासदार निधी, जिल्हा परिषदेकडून निधी, 14 व्या वित्त आयोगाकडून निधी, अशा विविध योजनांपासून ग्रामीण भागांतील गावांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी येत असला, तरी तो गावांपर्यंत पोहोचत नाही. ग्रामीण भागांतील गावांना मूलभूत सोयीसुविधा मिळत नाहीत. शासनाच्या नियोजनशून्यतेमुळे येणारा निधी शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.