पूरग्रस्त गडचिरोलीत अद्याप पंचनामे नाहीत; शेतकऱ्यांची अजित पवारांसमोर तक्रार

अजित पवार यांनी थेट बांधावर जात शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि पूरस्थितीचा आढावा घेतला.
Ajit Pawar_Gadchiroli
Ajit Pawar_Gadchiroli
Updated on

गडचिरोली : राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार हे सध्या पूरग्रस्त गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास अजित पवार हे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आणि पूरामुळं झालेल्या नुकसानीची माहिती प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून समजून घेतली. याठिकाणी अद्याप पंचनामे झाले नसल्याची तक्रार इथल्या शेतकऱ्यांनी केली. (No panchnamas yet in flood hit Gadchiroli Complaint of farmers before Ajit Pawar)

Ajit Pawar_Gadchiroli
शिंदे गटाला भाजपमध्ये विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही - अमोल मिटकरी

पंचनामे झालेत का? असा थेट प्रश्न जेव्हा अजित पवारांनी शेतकऱ्यांना विचारला. त्यावर शेतकरी म्हणाले, मागच्या वर्षी पंचनामे झाले होते पण आत्ता झालेले नाहीत. कोणताही अधिकारी अद्याप आमच्याकडे आलेला नाही. आम्ही यासाठी भटवाड्याच्या कोतवालाकडे अर्ज दाखल केला आहे. तसचं तातडीची मदत देखील अद्याप आम्हाला मिळालेली नाही. आर्थिक मदतीशिवाय सध्या आम्हाला काहीही नको.

Ajit Pawar_Gadchiroli
ईडीची उडाली झोप! अर्पिता मुखर्जीच्या दुसऱ्या घरातही सापडलं घबाड

पूरामुळं जर धानचं राहिलेलं नाही तर आम्ही पिककर्ज भरायचं कसं? असा सवाल करताना शेतकरी म्हणाले, धानाच्या पिकावर आम्ही कर्ज घेतो, पण आता तेच राहिलेलं नाही. यासाठी आम्हाला एकरी साडेबारा हजार कर्ज मिळतं अशी माहितीही यावेळी शेतकऱ्यांनी अजित पवारांना दिली. सरकारनं जर प्रयत्न करुन रोपं दिली तर त्याचा उपयोग होईल का? अशी विचारणा केल्यानंतर त्याचा आता उपयोग होणार नाही. कारण याचा सिझन आता दोन महिने पुढे गेला आहे. त्यामुळं याचाही उपयोग होणार नाही, असंही शेतकऱ्यांनी यावेळी सांगितलं.

शेतकऱ्यांची पीककर्जाबाबत महत्वाची मागणी

यावेळी शेतकऱ्यांनी पीककर्जाबाबत काही महत्वाच्या मागण्या विरोधीपक्ष नेत्यांसमोर मांडल्या. ते म्हणाले, ज्या शेतकऱ्यांनी आपल्या घरातील काहीबाही विकून का होईना पण वेळेत मार्चपूर्वी पीककर्जाची परफेड केली आहे. त्यांना किमान ५० हजार रुपयांपर्यंत नवं कर्ज मिळायला हवं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.