अचलपूर (जि. अमरावती) : भर पावसाळ्यातही टॅंकरने (Water Tanker) पाणीपुरवठा (City Water Supply) होत असणारे बिहाली हे मेळघाटातील (Melghat) गाव आता मात्र टॅंकरमुक्त झाले आहे. ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नातून बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे ही किमया झाली आहे. त्यामुळे कित्येक वर्षांनंतर गावातील विहिरीला झरे वाहू लागले आहेत. एका तपाहून अधिक काळ पाणी समस्येला तोंड देणारे बिहाली गाव आता टॅंकरमुक्त झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.(no water crisis in Bihali Melghat now)
चिखलदरा तालुक्यातील बिहाली गावाची ही कथा. येथे भर पावसाळ्यात टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत असे, शाश्वत पाणीपुरवठा योजना नाही, पाण्याचे नैसर्गिक स्रोत मर्यादित असल्याने या गावातील पाणीटंचाई पाचवीला पुजलेली होती. चिखलदऱ्यापासून केवळ 30 किलोमीटर अंतरावरील या गावाच्या पाणीटंचाईवर जिल्हा प्रशासनाला टॅंकरने पाणीपुरवठा करण्याखेरीज दुसरा कुठलाच प्रभावी पर्याय सापडू शकला नाही. मात्र दररोज टॅंकरच्या दोन-तीन खेपा पाणी घेण्यावरून होणारे भांडणतंटे आणि एकूणच पाण्याची कमतरता ग्रामस्थांनाही अंगवळणी पडली होती. त्यामुळे गावकऱ्यांनी पुढाकार घेत ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावातील मृत पावलेल्या विहिरींना जिवंत करून संजीवनी देण्यात आली.
परिणामी परिसरातील विहिरींचे झरे वाहू लागले आहेत. अनेक वर्षांपूर्वी गुळण्या मारत आटलेल्या विविध विहिरी पुन्हा जिवंत झाल्या आहेत. त्यामुळे आता ग्रामस्थांना टॅंकरची वाट न पाहता गावातच पाणी उपलब्ध होऊ लागल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
(no water crisis in Bihali Melghat now)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.