वर्धा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोन्नती अभियान, उमेदअंतर्गत विदर्भ पशू उन्नती संसाधन केंद्राद्वारे देवळीत हायजेनिक मटण शॉपची उभारणी करण्यात आली आहे. या माध्यमातून वर्धेकरांना घरपोच मटण मिळणार आहे. या योजनेअंतर्गत पशुसखी व तालुक्यातील पशुपालक यांना एक रोजगार व योग्य दरात पशू विक्री होणार आहे.
वर्धा जिल्ह्यातील व राज्यातील हा एकमेव प्रकल्प असून याचे योग्य व्यवस्थापन झाले तर अशा प्रकारचा प्रकल्प राज्यात प्रायोगिक तत्त्वावर उभारणी करण्यात येणार आहे. देवळी तालुक्यात तयार झालेल्या हायजेनिक मटण शॉपचे उद्घाटन नुकतेच झाले. या कार्यक्रमाला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा जिल्हा अभियान सहसंचालक सत्यजित बडे, जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेंभूर्णे, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. सचिन अलोणे, देवळीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. संजय खोपडे, उमेदच्या जिल्हा अभियान व्यवस्थापक स्वाती वानखेडे, जिल्हा व्यवस्थापक मार्केटिंग, मनीष कावडे, तालुका अभियान व्यवस्थापक ओमलता भोयर, देवळी, धर्मेंद्र तांत्रिक साह्य द गोट ट्रस्ट लखनऊ यांची उपस्थिती होती.
पशुसंवर्धन खात्यामार्फत हा प्रकल्प उमेद अभियानांतर्गत विदर्भ पशू उन्नती संसाधन केंद्र देवळी यांना राबविण्याकरिता दिलेला आहे. देवळी येथे जिल्हा वार्षिक नावीन्यपूर्ण योजनेतून हायजेनिक मटण शॉपची उभारणी करण्यात आलेली आहे. साडेबारा लाखांच्या खर्चातून शॉपची संकल्पना पूर्णत्वास आली. तात्पुरत्या स्वरूपात मोटर बाईकद्वारे सेवा पुरविण्यात येणार आहे. याकरिता डिगडोह रिंगरोडवर लीजवर जागा घेऊन स्लॉटर हाउसचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.
मटणाची विक्री काही दिवसात वातानुकुलित मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून केली जाणार आहे. संपूर्ण राज्यातून सर्वप्रथम देवळी शहरात मटण शॉपची प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात करण्यात आलेली आहे.
देवळी, वर्धा, सेलू शहरात तसेच तालुक्यातील गावातही मटणाची विक्री केली जाणार आहे. याकरिता तालुक्यातून पाचशे बचतगटाच्या माध्यमातून मालाची खरेदी केली जाणार आहे. त्यांच्या उत्पादनाला यशस्वी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याकरिता तालुका अभियान व्यवस्थापक ओमलता दरणे, संजय राऊत, तालुका समन्वयक, राहुल अतकरे, किशोर कोल्हे, मनोज चिखलकर, गौरव मातुरे, शुभांगी कामडी, कांचन होले, कविता भगत, विदर्भ पशू उन्नती संस्थान देवळी स्लॉटर हाउस अध्यक्ष अरुणा उरकुडे, सचिव अर्चना डंभारे यांच्यासह विविध पशू सखी व इतर सहकारी यांच्या मार्फत ही योजना यशस्वी करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेदच्या माध्यमातून या शॉपचे व्यवस्थापन एक हजार चौरस फूट जागेत सहा लाखांच्या खर्चातून स्लॉटर हॉउसचे बांधकाम करण्यात आले. उर्वरित जागेत शेळ्याची राहण्याची व्यवस्था तसेच त्यांच्याकरिता हिरवा चाऱ्याची लागवड केली जाणार आहे. तालुक्यातील पाच हजारच्यावर महिला पशुपालक तसेच 65 पशुसखी कार्यरत राहणार आहेत. अभियानांतर्गत या स्लॉटर हाउसची देखभाल विदर्भ पशू उन्नती संस्थान देवळी यांच्या देखरेखीखाली मटण विक्री केली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.