लक्षात ठेवा! आता २५ नव्हे तर अवघ्या १५ जणांनाच परवानगी; लग्नसमारंभांवर पुन्हा संक्रांत

लक्षात ठेवा! आता २५ नव्हे तर अवघ्या १५ जणांनाच परवानगी; लग्नसमारंभांवर पुन्हा संक्रांत
Updated on

अमरावती : कोरोनाच्या परिस्थितीमुळे (Corona) जिल्हाप्रशासनाने (Amravati District)cआता निर्बंध अधिक कठोर केले असून लग्नसमारंभांना (Marriage in Corona) सुद्धा त्याचा फटका बसणार आहे. रविवारपासून सात दिवस जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये (Lockdown) लग्न समारंभाला केवळ 15 जणांच्याच उपस्थितीला परवानगी राहणार आहे. त्यापेक्षा अधिक मंडळी उपस्थित राहिल्यास आयोजकांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. (Now only 15 members permission for marriage in Amravati)

लक्षात ठेवा! आता २५ नव्हे तर अवघ्या १५ जणांनाच परवानगी; लग्नसमारंभांवर पुन्हा संक्रांत
'मशीन आहे हो, पण टेक्‍निशियन नाही'; आरोग्य विभागाचा कारभार; रुग्णांचे हाल

जिल्ह्यात प्रामुख्याने ग्रामीण भागात कोरोना रूग्णसंख्येचा स्फोट झालेला आहे. अनेक गावांमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे. लग्न समारंभासारखे गर्दी होणाऱ्या सोहळ्यांच्या माध्यमातून कोरोनाचा अधिक फैलाव होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता लग्नसमारंभांवरच ब्रेक लावण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

जी मंडळी लग्न समारंभ स्थगित करू शकत नाही त्यांना 15 जणांची मर्यादा घालून देण्यात येणार आहे. नियमांचा भंग केल्यास फौजदारी कारवाई व दंड आकारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मंडप सुद्धा टाकण्यास मनाई राहणार आहे.

घरच्या घरी उरका लग्न

घरगुती पद्धतीने लग्न समारंभ साजरा करण्यात यावा तसेच त्यामध्ये बॅण्ड बाजा तसेच वऱ्हाडींना बंदी राहणार आहे. विशेष म्हणजे जेवणावळी सुद्धा करता येणार नाहीत. घरच्या घरीच 15 जणांच्या उपस्थितीत लग्न उरकावे लागणार आहे.

लक्षात ठेवा! आता २५ नव्हे तर अवघ्या १५ जणांनाच परवानगी; लग्नसमारंभांवर पुन्हा संक्रांत
महापालिकेचे घोषित केलेले लसीकरण केंद्रच बंद, नागरिकांमध्ये संताप
कोरोनाचा हा "स्ट्रेन' अधिक घातक सिद्ध होत आहे. त्यामुळे नागरिकांनी आता गर्दी होईल असे समारंभ टाळणे गरजेचे आहे. 9 ते 15 मे दरम्यान कडक लॉकडाउन लावण्यात येत असून शक्‍यतोवर लग्नसोहळा स्थगित करण्याचा प्रयत्न करावा.
- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी.

(Now only 15 members permission for marriage in Amravati)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.