शिवकुमारच्या त्रासामुळे दीपाली चव्हाणांचा गर्भपात, चौकशीतून समोर आली माहिती; गुन्ह्यांच्या कलामांमध्ये वाढ

number of offenses filed against Shivkumar has now been increased after investigation in deepali chavan suicide case in amravati
number of offenses filed against Shivkumar has now been increased after investigation in deepali chavan suicide case in amravati
Updated on

अमरावती : उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्या त्रासामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांचा गर्भपात झाल्याची बाब उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीतून पुढे आली. त्यामुळे शिवकुमारवर दाखल गुन्ह्याच्या कलमांमध्ये आता वाढ करण्यात आली आहे. 

आयएफएस अधिकारी शिवकुमारविरुद्ध धारणी ठाण्यात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. आता काही कलमांची वाढ करण्यात आली. गर्भपात होण्यास कारणीभूत ठरणे, मारण्याची व जीवे मारण्याची धमकी देणे याप्रकरणी कलम 312, 504 आणि 506 अन्वये त्यात वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. 

25 मार्च 2021 रोजी हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी दीपाली चव्हाण यांनी स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्याच दिवशी दीपाली यांच्या आत्महत्येसाठी गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक शिवकुमार हेच जबाबदार आहेत, असा आरोप दीपाली चव्हाण यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत केला होता. त्यामुळे शिवकुमार विरुद्ध गुन्हा दाखल होऊन 26 मार्च रोजी त्याला नागपूर येथून अटक झाली होती. 

शिवकुमारने त्रास दिल्यामुळेच आपला गर्भपात झाला, असे आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत दीपाली चव्हाण यांनी नमूद केले होते. उपविभागीय पोलिस अधिकारी पूनम पाटील यांनी याप्रकरणाचा तपास केला. या मुद्यावर पडताळणी करताना दीपाली चव्हाण यांनी घेतलेल्या औषधोपचाराचे दस्तऐवज पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले. त्याचा बारकाईने तपास केला. अनेक साक्षीदारांचे बयाण नोंदविले. नोंदविलेले बयाण, साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय दस्तऐवज हे पोलिसांच्या हाती लागले. त्यावरून कलमांमध्ये वाढ करण्यात आली. 

शिवकुमारने दीपाली यांना शिवीगाळ करून निलंबित करण्याची धमकी दिली. त्यांना भयभीत करून अपमानीत केल्याचे उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या तपासातून पुढे आले. त्यावरूनसुद्धा  कलमांमध्ये वाढ करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. शिवकुमार सद्य:स्थितीत न्यायालयीन कोठडीअंतर्गत मध्यवर्ती कारागृहात आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()