Anganwadi : अंगणवाड्यांच्या सकस आहारातून तेल गायब; आहारात तेलाचा समावेश करण्याची पालकांची मागणी

Anganwadi
Anganwadi
Updated on

परतवाडा : खाद्यतेलाचे दर तेजीत असताना अंगणवाडीतून दिल्या जाणाऱ्या सकस आहारातून अचानक बेपत्ता झालेल्या तेलाला सध्याच्या कमी दरात तरी पत्ता मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. आहार बनविताना तेलाचा पत्ता नसल्याने आहार बनवायचा कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या तेलाचे दर कमी झाल्याने आतातरी तेल उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

Anganwadi
Chh. Sambhajinagar : मोदींच्या योजना जगात भारी; आमदार हरिभाऊ बागडे यांचा दावा

महिला व बालविकास विभागाद्वारे प्रत्येक अंगणवाडीतून परिसरातील सहा महिने ते तीन, तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालक तसेच स्तनदा व गरोधर मातांना सकस आणि पूरक आहार पुरविला जातो. सहा महिने ते तीन वर्षे मुलांना तसेच गरोधर व स्तनदामाता लाभार्थ्यांना गहू, चणा, मूगडाळ, साखर, हळद पावडर, मिरची पावडर, मीठ दिले जाते. तर

तीन ते सहा वर्षे वयोगटाकरिता लाभार्थ्यांना आहारात गहू, तांदूळ, साखर, चणा, मसूर डाळ, मूगडाळ, तिखट, हळद, मीठ पॅकेट दिले जाते.

Anganwadi
Belgaum : मंत्रिपद हुकल्याने सवदी नाराज? डीके शिवकुमारांनी घेतली तातडीनं भेट; दोघांत अर्धा तास चर्चा

कोरोनात व नंतर तेलाच्या दरात वाढ होत असताना अंगणवाडीतून लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सकस व पूरक आहारातून तेल बेपत्ता झाले होते. त्यामुळे आहार बनवायचा कसा0 असा सवाल लाभार्थ्यांकडून उपस्थित केला जात होता. सध्या तेलाचे दर कमी झाले असून दरात घसरण सुरू असल्याने पूर्वीप्रमाणे अंगणवाडीतून मिळणाऱ्या पोषण आहारात तेलाचा समावेश करावा, अशी मागणी ग्रामीण भागातील लाभार्थी व पालकवर्गाकडून पुढे येत आहे.

लाभार्थ्यांना दर्जेदार पोषण आहार मिळाला पाहिजे. शासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन पोषण आहारात पूर्वीप्रमाणे सर्व कडधान्य तसेच तेलाचा समावेश करावा. यासंदर्भात पत्रव्यवहार करणार आहे.

-दिलीप उताणे, राज्य कार्याध्यक्ष, अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन.

शासन-प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. अंगणवाडीमार्फत दिल्या जाणाऱ्या आहारात पूर्वीप्रमाणे आवश्यक कडधान्यासोबत तेलाचा समावेश करावा.

-रवींद्र गवई, तालुकाध्यक्ष युवा स्वाभिमान.

तेलाशिवाय आहार बनणार कसा0 लाभार्थ्यांना दर्जेदार व परिपूर्ण पोषण आहार मिळणे गरजेचे आहे. शासनाने पूर्वीप्रमाणे आहारात मोट, बरबटी आदी कडधान्यासह तेलाचा समावेश करावा. आहारातील सर्व साहित्य उच्च प्रतीचे द्यावे.

-बळवंत गाठे, वंचित बहूजन युवा आघाडी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.