Amaravati News : पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धास लुटले

६० हजारांचा अंगठ्या पळविल्या; कठोरा नाका चौकातील घटना
crime
crimeesakal
Updated on

अमरावती : पोलीस असल्याची बतावणी करून एका वृद्धाजवळील ६० हजारांच्या दोन अंगठ्या लंपास करण्यात आल्या. ही घटना गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील कठोरा नाका चौकात मंगळवार, ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ६.४५ वाजता घडली. या प्रकरणी अज्ञात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिद्धीविनायकनगर येथील रहिवासी शरद उत्तमराव बुरघाटे (६५) हे मंगळवारी सायंकाळी कठोरा नाका चौकात मित्राची वाट बघत उभे होते. यावेळी दोन भामटे त्यांच्याजवळ आले. आम्ही पोलीस आहोत, चौकशी सुरू आहे, असे ते म्हणाले.

काल याच ठिकाणी तुमच्यासारख्या गृहस्थाला लुटण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही जवळील मौल्यवान वस्तू काढून ठेवा, असे भामटे म्हणाले. त्यापैकी एकाने शरद बुरघाटे यांच्याजवळील रूमाल आपल्या हातात ठेवला आणि त्यांच्या बोटातील दोन अंगठ्या काढून त्यात ठेवल्या. त्यानंतर रूमाल गुंडाळून तो शरद बुरघाटे यांना खिशात ठेवण्यासाठी दिला. लवकर घरी जा, असा सल्लाही भामट्यांनी त्यांना दिला. त्यामुळे शरद बुरघाटे तेथून घरी जाण्यासाठी निघाले. काही अंतरावर गेल्यावर संशय आल्याने शरद बुरघाटे यांनी रुमाल उघडून बघितला.

त्यावेळी त्यांना दोन्ही अंगठ्या दिसून आल्या नाही. त्यामुळे शरद बुरघाटे यांनी पुन्हा कठोरा नाका चौकात जावून त्या दोन भामट्यांचा शोध घेतला. मात्र, ते अंगठ्या घेऊन पसार झाले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर शरद बुरघाटे यांनी गाडगेनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीवरून अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.