यवतमाळ - खरतर माणूस शेवटच्या क्षणापर्यंत एक विद्यार्थी म्हणूनच जीवन जगत असतो. रोज नवीन नवीन काही तरी शिकत असतो. मात्र, ज्यांना काबाडकष्ट करीत म्हातारपण आले अशा जिल्ह्यातील दोन आजींनी यंदाच्या प्रौढ असाक्षरांच्या परीक्षेत चक्क ९८ टक्के गुण मिळवीत सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला. शिक्षण कोणत्याही वयात घेतले जाऊ शकते हेच त्यांनी सिद्ध करून दाखविले.
या दोन आजींनी कधी हातात पाटी पुस्तक धरले नव्हते. त्या कधीही शाळेत गेल्या नव्हत्या. आता शेवटच्या आश्रमात शिक्षणाची संधी मिळताच त्यांनी संधीचे सोने केले. एकीचे नाव मीरा मारोती पेंदोरे, तर दुसरीचे नाव सुशीला पुंजाराम ढोके असे आहे. प्रौढ असाक्षरांसाठी झालेल्या परीक्षेतील टॉप वयोवृद्ध विद्यार्थ्यांची ही यशोगाथा आहे.
प्रौढ असाक्षरांना शिकवून त्यांची १५० गुणांची परीक्षा घेण्यात आली. त्याचा निकाल नुकताच राष्ट्रीय मुक्त विद्यालय मंडळातर्फे जाहीर करण्यात आला. त्यामध्ये मीरा पेंदोर रा. अकोला (बाजार), तालुका यवतमाळ आणि सुशीला ढोके (रा. घारफळ, तालुका बाभूळगाव) या दोन आजींनी चक्क ९८ टक्के गुणांची कमाई करीत इतर ज्येष्ठ महिलांपुढे आदर्श ठेवला. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.