Independence Day : स्वातंत्र्य दिनी महिलांचा एल्गार, पोलिसांना घेतले सोबत अन् पकडून दिली दारू

Latest Buldhana News: महिलांच्या सुविधा आणि गावातील घाणीचे साम्राज्य या विषयाला घेऊन ग्रामपंचायत ला धडक दिली.
Independence Day : स्वातंत्र्य दिनी महिलांचा एल्गार, पोलिसांना घेतले सोबत अन् पकडून दिली दारू
Updated on

Latest Crime News: स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर त्रस्त असलेल्या दोन गावातील महिलांनी पुकारला एल्गार . यात एका गावात तर महिलांनी पोलिसांना घेऊन थेट विनापरवाना दारू विक्रेत्याच्या घरात घुसून दारू पकडून दिली . तर दुसऱ्या गावात महिलांच्या सुविधा आणि गावातील घाणीचे साम्राज्य या विषयाला घेऊन ग्रामपंचायत ला धडक दिली.

वरील दोन्ही घटना तालुक्यातील बोडखा आणि पातूरडा येथे 15 आगष्ट रोजी झेंडा वंदन नंतर घडल्या. दोन्ही घटना प्रशासनाच्या कामचुकरपणाचा भाग म्हटला तरी हरकत नसावी.

प्राप्त माहिती नुसार बोडखा गावात 4 ठिकाणी विनापरवाना देशी दारू ची विक्री गेल्या कित्येक दिवसापासून सुरू आहे. यात मजुरी करणाऱ्या महिला त्रस्त झाल्या आहेत.

Independence Day : स्वातंत्र्य दिनी महिलांचा एल्गार, पोलिसांना घेतले सोबत अन् पकडून दिली दारू
Independence Day 2024 : गुलामीच्या अंधारातून तेजोमय स्वातंत्र्य घेऊन येणारी कशी होती १५ ऑगस्ट १९४७ ची ती सुवर्ण सकाळ!

दारूचे व्यसन घरा घरात घुसल्याने महिलांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. दारू मुळे बरेच वेळा वाद विवाद ही होत आहेत. म्हणून महिलांनी पुढाकार घेऊन पोलिसांना माहिती देऊनही काहीच कार्यवाही करण्यात आली नाही. शेवटी महिलांनी 3 दिवसा पूर्वी निवेदन देऊन दारू बंद झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

त्यावर 15 आगष्ट रोजी या महिलांनी रौद्र रूप धारण करून 112 ला कॉल करून दारू विक्री ची माहिती दिली. आणि तामगाव पोलीस स्टेशन चे पोलीस गावात पोहचले सदर महिलांनी पोलिसांना सोबत घेऊन दारू विकणाऱ्या च्या घराची झडती घेतली.

झडती मध्ये दोन घरात विनापरवाना दारू दिसून आली तर दोन घरात सापडली नाही. महिलांनी पोलिसां समोर समस्या मांडताना संताप व्यक्त केला.

तर पातूरडा येथील कृपा सिंधु ग्राम संघ व गावातील नागरीक व महीला वर्ग यांनी गावातील समस्यां बाबत ग्रामपंचायत ला निवेदन दिले होते.

Independence Day : स्वातंत्र्य दिनी महिलांचा एल्गार, पोलिसांना घेतले सोबत अन् पकडून दिली दारू
Independence Day: वीर सावरकर-सुभाषचंद्र बोस टी-शर्टवर पाहून संताप, गुजरातमध्ये तिरंगा यात्रा थांबवली अन् काढले कपडे... एकच गोंधळ!

त्या मध्ये गावात कचरा साफ करणारी गाडी महिन्यातुन कीती दिवस फीरते यावर चर्चा करून माहीती देण्यात यावीः

गावातील नाली सफ‌ा‌ई बाबत वाई वाईज नियोजन करण्यात यावे.गावातील अतंर्गत रस्ते मागील तीन महीण्या पासुन नळाची पाईप लाईन टाकल्यामुळे खराब झालेले आहेत. आठवडी बाजारात घाणीचे साम्राज्य पसरलेले असून सुलभ शौचालयाची व्यवस्था ही नाही त्यामुळे महिलांची कुचंबना होत आहे . असे विषयाचे निवेदन घेऊन 15 आगष्ट ला दिडशे ते दोनशे महिलांनी ग्रामपंचायत ला धडक दिली . महिलांचा रोष पाहता सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांनी काढता पाय घेतला. शेवटी ग्रामपंचायत च्या कर्मचाऱ्याला पाठवून निवेदन स्वीकारले.

याठिकाणचे ग्रामविकास अधिकारी 17 वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असताना गावातील समस्या साठी महिलांना घराबाहेर निघावे लागले याला काय म्हणावे!

Independence Day : स्वातंत्र्य दिनी महिलांचा एल्गार, पोलिसांना घेतले सोबत अन् पकडून दिली दारू
Independence Day: वीर सावरकर-सुभाषचंद्र बोस टी-शर्टवर पाहून संताप, गुजरातमध्ये तिरंगा यात्रा थांबवली अन् काढले कपडे... एकच गोंधळ!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.