अस्थी विसर्जनानंतर बंधाऱ्यात पोहणे बेतले जिवावर

अस्थी विसर्जनानंतर बंधाऱ्यात पोहणे बेतले जिवावर
Updated on

चिमूर (जि. चंद्रपूर) : तालुक्यातील गरडापार येथील महिलेच्या अस्थी विसर्जनानंतर गावा जवळील बंधाऱ्यात मोरेश्वर दामाजी नन्नावरे (वय ५०) हे पोहायला गेले. पाण्याचा प्रवाह गतिशील असल्याने बुडून वाहत गेले. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह दुपारी दोन वाजताच्या सुमारास बंधाऱ्यापासून दोन किलो मीटर अंतरावर आढळला.

मिळालेल्या माहितीनुसार, गरडापार येथील ताराबाई पुंडलिक दडमल (वय ६०) यांचा सोमवारी मृत्यू झाला. त्यांचा अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम मंगळवारी सकाळी पार पडला. त्यानंतर मोरेश्वर दामाजी नन्नावरे (वय ५०) व दिलीप नन्नावरे गावातील बंधाऱ्यावर सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास पोहायला गेले. पाण्याच्या प्रवाहाची गती जास्त असल्याने मोरेश्वर वाहत गेले. तर दिलीप बंधाऱ्याकडील वेलाचा आधार मिळाल्याने स्वतःला कसेबसे वाचविले.

अस्थी विसर्जनानंतर बंधाऱ्यात पोहणे बेतले जिवावर
धावल्यानंतर भूक का लागते? जाणून घ्या कारण...

घटनेची माहिती चिमूर पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळावर पोलिस हवालदार मेहरकुरे सहकाऱ्यांसह पोहोचले. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने मोरेश्वर यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. दुपारी दोन वाजताच्या सुमारास मोरेश्वर यांचा मृतदेह बंधाऱ्यापासून दोन किलोमीटर अंतरावर आढळून आला. प्रेत उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय, चिमूर येथे पाठवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.