Yavatmal : दारू पिऊन निजला अन् कायमचाच गेला

Arni-Yavatmal Latest news |एकटाच राहणारा इसम अतिमद्यप्राशन करून एका शेडमध्ये झोपी गेला अन् झोपेतच त्याचा मृत्यू झाला. ही घटना शहरातील डागा कॉलनी परिसरात सोमवारी (ता. २९) सकाळी उघडकीस आली. गजानन उर्फ संदीप गोविंद काळे (वय ४३) असे मृताचे नाव आहे.
 one who lives alone drank heavily and fell asleep died in sleep yavatmal
one who lives alone drank heavily and fell asleep died in sleep yavatmalSakal
Updated on

आर्णी : एकटाच राहणारा इसम अतिमद्यप्राशन करून एका शेडमध्ये झोपी गेला अन् झोपेतच त्याचा मृत्यू झाला. ही घटना शहरातील डागा कॉलनी परिसरात सोमवारी (ता. २९) सकाळी उघडकीस आली. गजानन उर्फ संदीप गोविंद काळे (वय ४३) असे मृताचे नाव आहे.

या प्रकरणात केशव सोनबाजी फुपरे (वय ५२) रा. रुद्रपूर ता. आर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. फिर्यादीनुसार, गजानन उर्फ संदीप हा आर्णी येथे एकटाच राहत होता. त्याला दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत तो डागा कॉलनीत एका टिनपत्र्याच्या शेडजवळ झोपला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

तो नेहमी दारूच्या नशेत शहरात फिरत होता. त्याला घरदार नसल्याने तो शेडमध्ये रात्री येऊन झोपत होता. अतिशय दारू पिल्याने झोपेतच मरण पावला, अशी फिर्याद दाखल करण्यात आली. त्यावरुन पोलिसांनी नोंद घेउन शवविच्छेदन करण्यात आले. ही कार्यवाही ठाणेदार केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात जमादार देवानंद मुनेश्वर, रवींद्र चव्हाण यांनी केली. ऐनवेळी पोलिसांना गजाननच्या नातेवाइकांची माहिती मिळाली.

 one who lives alone drank heavily and fell asleep died in sleep yavatmal
Nagpur : तमिळनाडूला कावेरी नदीचे पाणी मिळावे...अंदमान एक्स्प्रेसच्या इंजिनवर चढले शेतकरी; 40 मिनिटे रोखून धरली रेल्वे

त्यानंतर माजी माजी नगरसेवक चिराग शाह यांनी उमरखेड येथे राहणारी गजाननची बहीण ममता पांडे व जावई सचिन पांडे यांना भ्रणध्वनीवरून घटनेची माहिती दिली. त्यामुळे हे दोघेही तातडीने आर्णीत दाखल झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.